म्युकरमायकोसिस संसर्ग काय आहे, काय करावे आणि काय करू नये : जाणून घ्या सविस्तर

0
83
Satara Civil Dr. Subhash Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | म्युकरमायकोसिस संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. वेळेत निदान व उपचार झाल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होतो. या म्युकरमायकोसिसवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाबरोबरच कराड येथील सह्यादी हॉस्पिटल व कृष्णा मेडिकल कॉलेज या रुग्णालयांमध्येही उपचार केले जाणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी 104 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या आजारासाठी वरील हॉस्पिटलसाठी नोडल अधिकारी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक देवीदास बागल (मो. नं. 9850415540) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिस काय आहे :-

म्युकरमायकोसिस (काळी बुरशी/ब्लॅक फंगर्स) हा एक सामान्यत: दुर्मिळ असा बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) आजार आहे. कोरोनाकाळात ह्या आजाराचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा रोग प्रामुख्याने वैद्यकीय समस्या असणाऱ्या लोकांना प्रभावित करतो. त्यामुळे त्यांची रोगाविरुद्ध लढ्याची क्षमता कमी होते.

https://www.facebook.com/dioinfosatara/videos/506752087035334

म्युकरमायकोसिस कशामुळे होतो :-

म्युकर नावची बुरशी जमिनीत, खतांमध्ये सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या नाकात आणि नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते, जसे कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही बाधा असलेले रुग्ण, ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे असे रुग्ण, अशांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते.
या रोगाचा अधिक धोका कोणाला आहे :- ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा डायबेटीस अनियंत्रित आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे, ज्यांना इम्यूनमोड्युलेटर्स अर्थात रोगप्रतिकार शक्तित फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे व ज्यांना जुनाट किंडनी (मूत्रपिंड) किंवा लिव्हर (यकृत) आजार आहे.

धोकादायक परिणाम टाळण्यासाठी या लक्षणांवर लक्ष ठेवा :-

डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजुला लाली येणे, नाक चोंदणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात हिरड्या दुखणे, दांत ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम.

हे करा :-

रक्तातील साखरेची, HbA1C ची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविड-19 नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायर मध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा व ॲटिबायोटिक्स/ॲटिफंगल औषधांचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा.

हे करु नका :-

आजारची चिन्हे आणि लक्षणे याकडे दुर्लक्ष करु नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरियल सायनुसायटिस मुळे असावे असा विचार करु नका (विशेषत: immunosuppression झालेले आणि कोविडमुळे ज्यांना immunosuppression चे उपचार दिले गेले आहेत), या आजाराची तपासणी करुन घेण्यास आग्रही रहा, दुर्लक्ष करु नका व म्युकरमायकोसिस या आजारावर त्वरित उपचार करा व वेळ घालवू नका.

तरी ज्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य विभागशी संपर्क साधावा. या आजारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातात, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here