हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pre-Approved Loan : आपल्या दररोजच्या आयुष्यात आपल्याला अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी तसेच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत बऱ्याचदा बँकांकडून कर्ज घेतले जाते. मात्र, कोणतेही कर्ज देण्याआधी बँकेकडून आपली क्रेडिट हिस्ट्री आणि CIBIL स्कोअर तपासला जातो. त्याच आधारावर मग आपल्याला लोन दिले जाते. मात्र एक असे कर्ज देखील आहे ज्यासाठी आपल्याला अर्ज करण्याची गरज भासत नाही. यामध्ये बँक स्वतः आपल्याला ‘Pre-Approved Loan’ ऑफर करते.
मात्र, ज्या ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट किंवा CIBIL स्कोअर चांगला आहे आणि ते कर्जाची परतफेड करू शकतील अशाच ग्राहकांना बँकेकडून प्री-अप्रूव्ड लोन दिले जातात. प्री-अप्रूव्ड लोन हे नियमित कर्जापेक्षा वेगळे कसे आणि त्याचे फायदे काय आहेत याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात…
Pre Approved Loan म्हणजे काय ???
जे कर्ज घेण्यासाठी ग्राहकांना अर्ज करावा लागत नाही त्याला प्री-अप्रूव्ड लोन असे म्हंटले जाते. अशी कर्जे अनेक बँकांकडून दिली जातात. मात्र प्रत्येक बँकांकडून प्री-अप्रूव्ड लोनसाठी स्वतःच्या अशा अटी असतील. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्नाचा स्त्रोत माहित आहे त्यांनाच बँकेकडून प्री-अप्रूव्ड लोन दिले जाते.
हे नियमित कर्जापेक्षा वेगळे कसे आहे???
जेव्हा आपण नियमित कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँकेकडून सर्वात आधी आपली आर्थिक माहिती गोळा केली जाते. त्याच आधारावर बँकेकडून आपल्याला कर्ज दिले जाते. मात्र प्री-अप्रूव्ड लोनच्या बाबतीत, बँकेकडे आपली सर्व माहिती आधीच उपलब्ध असते. नियमित कर्जामध्ये आपल्या कर्जाची रक्कम आणि त्यावर लागू होणाऱ्या व्याजदराबाबतची माहिती बॅंकेकडून आपल्या अर्जाचे रिव्यू केल्यानंतरच सांगितले जाते. मात्र Pre-Approved Loan मध्ये ही माहिती आपल्याला आधीच सांगितली जाते.
Pre-Approved Loan चे फायदे जाणून घ्या
Pre-Approved Loan चा सर्वात मोठा फायदा असा कि, यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची गरज भासत नाही किंवा यासाठी कोणतीही कागदपत्रे देखील द्यावी लागत नाही. तसेच प्री-अप्रूव्ड लोन न स्वीकारल्याने आपल्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम देखील होत नाही. हे जाणून घ्या कि, क्रेडिट कार्डद्वारे वेळेवर पेमेंट करणार्या आणि आधीच्या कर्जाची वेळेवर परतफेड करणार्या ग्राहकांना बँकाकडून बर्याचदा प्री-अप्रूव्ड लोन दिले जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/pre-approved-personal-loan-offer
हे पण वाचा :
‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
LIC च्या पॉलिसीमधील नॉमिनी बदलण्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या
PAN-Aadhaar Link : ‘या’ तारखेपर्यंत पॅन आधारशी करा लिंक, अन्यथा करावा लागेल अडचणींचा सामना