‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | पूजा शरद शिंदे

गेली ३ महिने कोरोनाचा कुटाणा सुरु आहे. लोकांना आता काय करावं आणि काय नको असं होतंय. सगळीकडे बऱ्याच चर्चा झाल्या. उपाययोजनाही सांगितल्या गेल्या. पण ही व्हायरस नावाची भानगड काय आहे हे बऱ्याच जणांना अजून समजलंच नाही. शाळेत विज्ञान अवघड वाटणाऱ्यांनी तर हा विषय फक्त हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे इतक्यापर्यंतच मर्यादित ठेवला. हाच विषय सोप्या भाषेत पोहचवण्यासाठी हा सोपा लेख.

सध्या दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. जंतूपेक्षासुद्घा सूक्ष्म असणाऱ्या व्हायरसला सारं जग घाबरलय. कारण व्हायरस म्हटलं की भीती वाटतेच. व्हायरस म्हणजे विषाणू. एक अतिशय सूक्ष्म, सजीव नसलेला जैविक कण होय. जस पृथ्वीवर मानव प्राणी, पक्षी, इतर प्राणी, वनस्पती, जीवजंतू आहेत तसेच विषाणूसुद्धा आहेत. जंतू(बॅक्टरिया)पेक्षा विषाणू लहान असतात व इन्फेक्शन करतात. म्हणजेच इतर जीवांना रोग पसरवतात. विषाणूंसारखे सगळेच जंतू विषारी नसतात,म्हणून जंतूपेक्षा विषाणू भयानक आहेत. सर्वप्रथम लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबिज हा रोग बॅक्टरियापेक्षा लहान असणाऱ्या कणामूळे होतो असं सांगितलं. आणि या छोट्या कणाला त्यांनी लॅटिन भाषेत ‘poison’ असं म्हटलं. नंतर १८९२ साली रशियन शास्त्रज्ञ Demitri Ivanowsky यांनी वनस्पतीवर सापडणाऱ्या टोबॅक्को मोझाइक व्हायरस यावर संशोधन चालू असताना लुईस पाश्चर यांचं गृहितक मान्य केलं, की बॅक्टेरियापेक्षा (जंत) पण सूक्ष्म असा कण आहे जो इन्फेक्शन करू शकतो. कालांतराने विसाव्या शतकात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर शास्त्रज्ञांनी या कणालाच ‘व्हायरस’ असे नाव दिले. हळूहळू विज्ञान पुढे जात असताना पोलिओ,डेंग्यू, प्लेग,रेबीज अशा अनेक विषाणूंचा शोध लागला आणि अजूनही या यादीत भर पडतच आहे. HIV, कॅन्सर, रेबीज हे बलाढ्य आजार या व्हायरसचीच देण आहेत. मागील काही काळात दिसून आलेले निपाह, ईबोला, H1N1विषाणू पुर्णपणे नवीनच आहेत असं नाही. हे पूर्वी प्राण्यांच्यात दिसणारे व्हायरस आता माणसांना हानी पोहोचवत आहेत.

कोरोना म्हणजे नक्की काय? – कोरोना हा विषाणूंच्या मोठ्या वर्गातील विषाणू असून त्याचे अस्तित्व मनुष्य, गायी, मांजर, वटवाघूळ इत्यादी सस्तन प्राण्यांमध्ये तसेच काही पक्ष्यांमध्ये (कोंबड्या) दिसून आले आहे. या विषाणूंच्या एकुण सात प्रजाती आहेत. त्या म्हणजे 229-E, NL-63, OC-43, HKU1, MERS-CoV, SARS-CoV, SARS-CoV-2/COVID-19. यापैकी पहिल्या चार प्रजाती सर्दीशी निगडित आहेत तर उरलेल्या तीनमुळे श्वसनसंस्थचे न्यूमोनियासदृश गंभीर आजार निर्माण होतात. नैसर्गिकरित्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असणारे हे विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात व नंतर माणसा-माणसाच्यात त्याचे संक्रमण सुरू होते. कोरोना हा गोलाकार (Spherical Structure) असतो. त्याच्या पृष्ठावर खूप सारे spikes (काट्यासारखे आवरण) असतात. एकंदरीत तो एखाद्या मुकुटासारखा (Crown) भासतो. लॅटिन भाषेत Crown ला कोरोना म्हणतात. म्हणून त्याच नाव कोरोना (Crown like appearance). ‌कोरोनाच नाव – Co- Corona, Vi- Virus, D- Disease, 19- 2019 मध्ये सापडला म्हणून 19 असे ठेवण्यात आले आहे. व्हायरस हे होस्ट स्पेसिफिक असतात. म्हणजेच एका प्रजातीला बाधित करणारे व्हायरस दुसऱ्या प्रजातीला बाधित करतीलच असे नाही. काही व्हायरस हे फक्त प्राण्यांमध्ये दिसून येतात तर काही माणसांमध्ये. असं म्हटलं जातं की, वटवाघळामध्ये खूप सारे व्हायरस असतात. चीनच्या वूहानमधील ज्या लॅबमधून कोरोना सुटला असं म्हटलं जात आहे, त्याठिकाणी सुद्धा वटवाघळांवर शोध कार्यक्रम चालू होते. वटवाघूळ आणि Pangelion (खवल्या मांजर) या दोन प्राण्यांच्या शरीरात सापडणारा कोरोना हा सध्याच्या Covid-19 सारखाच आहे. वटवाघूळ खवल्या मांजरीने खाल्ले व खवल्या मांजरांना माणसांनी खाल्लं असल्यामुळेसुद्धा हा व्हायरस माणसात आलेला असू शकतो. परंतु या केस स्टडीला अजूनही कुणीही सहमती दर्शवलेली नाही. त्यामुळे मग नेमका हा व्हायरस माणसात कसा आलेला याबद्दल अजूनही साशंकता आहे.

व्हायरस नक्की कसाय? – मग हा जो छोटा कण आहे व्हायरसचा त्याचं आपण structure बघुया. म्हणजे तो कशापासून बनलाय. जसं आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत, ते अवयव पेशींपासून बनलेत तस व्हायरसला पण असतील? तर नाही. व्हायरसला अवयव नाहीत. म्हणून तर तो इतका छोटा आहे. त्याच्यामध्ये फक्त DNA/RNA(जनुकीय केंद्रके) आणि त्यावर प्रोटीनचं (प्रथिनांच)अावरण इतकंच आहे त्याच्याजवळ. तरी तो आपल्या पेशींना मारतोय. कसं? तर आपल्याच पेशी वापरून. जेव्हा ते आपल्या पेशीमध्ये जातात तेव्हा अॅक्टिव होतात आणि त्या पेशींचा ताबा स्वतःकडे घेतात. पेशीमधील वेगवेगळे घटक वापरून अनेक व्हायरस तयार करतात. नंतर ती पेशी फुटते आणि मग ते शरीरातील इतर पेशींना इन्फेक्ट करतात. हळूहळू सर्व शरीराचा ताबा स्वतः कडे घेतात. म्हणजेच आपल्याला रोग झालाय असं आपण म्हणतो. हा व्हायरस जेव्हा शरीरात पोहोचतो तेव्हा सुरवातीच्या काळास incubation period असे म्हणतात. म्हणजे व्हायरस शरीरात आल्यापासून ते लक्षणे दिसेपर्यंतचा काळ. व्हायरसने श्वासावाटे शरीरात प्रवेश केला की तो आधी घशातील पेशींवर हल्ला करतो. त्यानंतर तो श्वासनलिकांद्वारे फुफ्फुसांमध्ये जातो. तो या ठिकाणी गेल्यावर व्यक्तीला त्रास जाणवू लागतो.

व्हायरसचा शरीरावरील परिणाम – फुफ्फुसांमध्ये गेल्यावर तो स्वतःची संख्या वाढवू लागतो व नवीन तयार झालेले व्हायरस असे सगळे इतर पेशींवर हल्ला करू लागतात. यावेळी व्यक्तीला ताप येणे, घसा खवखवणे, खोकला( कोरडा), अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. यावेळी रोगप्रतिकरकशक्ती व्हायरसशी लढा द्यायचं काम करत असते. ही स्थिती जवळपास एक आठवडा असते. जर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर एका आठवड्यात रुग्ण बरा होऊ शकतो. नाहीतर कोरोनाची गंभीर लक्षणे दिसू लागतात. वयोवृध्द माणसांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने याचा जास्त धोका त्यांना असतो. आजाराने गंभीर रूप धारण केल्यानंतर किडनीवर,आतड्यावर याचा परिणाम होऊ लागतो. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो. जास्तीत जास्त खबरदारी यासाठी घेतलीच पाहिजे. कारण मृत्यूदर जरी कमी असला तरी तो वेगाने पसरतोय. आणि काळजी न घेतल्याचं उदाहरण इटली, अमेरिका यांच्या रूपाने पाहतच आहोत. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला (विश्वव्यापी साथीचा रोग – महामारी) जाहीर केलेलं आहे. कोरोनाचा प्रसार हा बाधित व्यक्ती खोकताना, शिंकताना त्याच्या नाकातून अथवा तोंडातून जे थेंब (droplets) बाहेर पडतात त्यातून संपर्कात आलेल्या व्यक्तींना होतो. यासाठी अशा व्यक्तिपासून सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क किंवा रुमालचा वापर करून नाक आणि तोंड पॅक करणे, सतत हात धुणे याचा अवलंब केला पाहिजे. ठराविक अंतराने डोळ्यांना, नाकाला हात लागू न देता स्वच्छ हात धुवावेत. यावर सगळ्यात सुरक्षित उपाय म्हणजे घरी राहणे. ज्या व्यक्तींना श्वसनाचा त्रास आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे (वयोवृध्द, लहान मुले, उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती) अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

व्हायरस कसा संपेल – व्हायरस हा पेशीच्या बाहेर जास्त काळ टिकत नाही म्हणजे वस्तूवर राहत नाही. नंतर आपोआप तो नष्ट होऊन जातो. कारण त्याला जगायला जिवंत पेशीची गरज आहे. जेव्हा तो पेशीच्या बाहेर हवेत, मातीत, निसर्गात इतरत्र आढळतात तेव्हा ते निष्क्रिय (inert) अवस्थेत असतात. जेव्हा ते शरीरात जातात,पेशीत घुसतात, तेव्हाच ते अॅक्टिव होतात. आणि त्याची पुनरुत्पादन करण्याची पद्धत बॅक्टरियापेक्षा पूर्णतः वेगळी आहे. व्हायरस रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या mechanism दाखवतो. त्यामुळे अँटिबायोटिक लवकर परिणाम करू शकत नाही. अद्याप तरी रोगास खात्रीलायक असे औषध अथवा लस उपलब्ध नाही. परंतु विज्ञानातील प्रगतीमुळे यावर नक्कीच उपाय निघेल. यासाठी आपण व्हायरसला न घाबरता सांगितलेल्या सुचनांच पालन करणे व सरकारवर, डॉक्टरांवर विश्वास ठेवून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचं आहे. अफवांवर विश्वास न ठेवता योग्य ती काळजी घेऊन आपण आपलं, आपल्या कुटुंबाच पर्यायाने आपल्या देशाचं संरक्षण केलं पाहिजे.

लेखिका परिचय – पूजा शिंदे या बळवंत महाविद्यालय, विटा येथे सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापक म्हणून काम करतायत. त्यांना ललितलेखन आणि विज्ञान विषयक सुलभ लेखनाची आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 9359315757

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Leave a Comment