Digital Gold म्हणजे काय? गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लोकं अनेक शतकांपासून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण पिवळा धातू डेट आणि इक्विटीपेक्षा सुरक्षित गुंतवणूकिचा पर्याय मानला जातो. बहुतेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने आहे कारण यामुळे सातत्याने चांगला परतावा मिळत आहे. पूर्वी फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केली जात होती परंतु आता डिजिटल सोन्यात गुंतवणूक अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि स्टॉक ब्रोकरद्वारे केली जाऊ शकते. त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात…

तर सर्वात आधी डिजिटल गोल्ड म्हणजे काय हे जाणून घ्या?
डिजिटल सोने ऑनलाईन खरेदी केले जाऊ शकते आणि ग्राहकाच्या वतीने विक्रेत्याद्वारे इंश्योर्ड केलेल्या तिजोरीत साठवले जाते. यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट, मोबाईल बँकिंगची गरज आहे आणि तुम्ही सोन्यामध्ये डिजिटली कधीही, कुठेही गुंतवणूक करू शकता. यामध्ये खरेदीची किमान मर्यादा नाही, म्हणून तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

डिजिटल गोल्ड कोठे खरेदी करायचे ते जाणून घ्या?
पेटीएम, गुगल पे आणि फोनपे सारख्या अनेक मोबाईल ई-वॉलेटमधून तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. एचडीएफसी सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल यांसारख्या ब्रोकरद्वारेही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे.

या कंपन्या डिजिटल गोल्ड देतात
सध्या, भारतात डिजिटल गोल्डची ऑफर देणाऱ्या तीन कंपन्या आहेत-ऑगमोंट गोल्ड लि., एमएमटीसी-पीएएमपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सेफ ब्रँड असलेली एमएमटीसी लि. आणि स्विस कंपन्या एमकेएस पीएएमपी आणि डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संयुक्त सेफगोल्ड ब्रँड आहे.

डिजिटल गोल्ड खरेदीचे फायदे
आपण कमी प्रमाणात देखील सोने खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमीने गुंतवणूक सुरू करू शकता. याद्वारे तुम्ही शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता. यामध्ये दागिने बनवण्याचा खर्च नाही. यामुळे पैशांचीही बचत होते. फिजिकल गोल्ड प्रमाणे ते सुरक्षित ठेवण्याची तसदी घ्यावी लागत नाही.

पारदर्शकता आणि रिअल टाइम अपडेट आवश्यक
जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करता, तेव्हा लक्षात ठेवा की जिथे तुम्ही गुंतवणूक करत आहात ती फर्म तुम्हाला पारदर्शकता आणि रिअल टाइम अपडेट देत आहे किंवा नाही. कारण किमतींमध्ये कधी बदल होतो हे तुम्हाला लगेचच कळले नाही तर तुम्ही कदाचित जास्त आणि योग्य नफा कमवू शकणार नाही.

NSE सदस्यांना डिजिटल गोल्डच्या विक्रीवर बंदी
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने 10 सप्टेंबरपासून आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्याची विक्री थांबवण्याचे निर्देश स्टॉक ब्रोकर्ससह सदस्यांना दिले आहेत. मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने चिंता व्यक्त केल्यानंतर NSE ने हे निर्देश दिले आहेत. सेबीने म्हटले होते की,” काही सदस्य आपल्या ग्राहकांना डिजिटल गोल्ड खरेदी आणि विक्रीसाठी प्लॅटफॉर्म देत आहेत, जे नियमांच्या विरोधात आहे.”

Leave a Comment