‘DUNKI’ म्हणजे काय??? शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या थीमविषयी जाणून घ्या !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाहरुख खान बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 2023 मध्ये किंग खान  ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘DUNKI’ अशा बॅक टू बॅक तीन सिनेमांमध्ये दिसणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’ या दोन्ही चित्रपटात शाहरुखची भूमिका काय असेल याची झलक चाहत्यांना अनेक वेळा पाहायला मिळाली. मात्र ‘डंकी’ या चित्रपटाबाबत चाहत्यांना अजूनही उत्सुकता लागून राहिली आहे.

‘DUNKI’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू देखील असणार आहे. मात्र या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. वास्तविक, या चित्रपटाचे नाव DONKEY नसून DUNKI असे आहे आणि त्याला विशेष असा अर्थ देखील आहे.

Big Announcement: Shah Rukh Khan's DUNKI

किंग खानने देखील जेव्हा पहिल्यांदा हे शीर्षक ऐकवले गेले तेव्हा तो देखील आश्चर्यचकित झाला. हे जाणून घ्या कि, या चित्रपटाची थीम गाढवावर आधारित नसून डंकी फ्लाइटवर आधारित आहे. हे लक्षात घ्या कि, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरत असलेल्या मार्गाला DUNKI फ्लाइट असे म्हंटले जाते. भारतीय लोकांबद्दल बोलायचे झाले तर, अमेरिका आणि कॅनडाला जाण्यासाठी अशाच मार्गाचा अवलंब केला जातो.

Dunki Trailer (2022) | Shah Rukh Khan | Taapsee Pannu | Rajkumar Hirani,  Release Date,Pathan Trailer - YouTube

हा चित्रपट एक ड्रामा चित्रपट असेल, ज्यामध्ये एका पंजाबी मुलाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. हा मुलगा ‘DUNKI फ्लाइट’ ने कॅनडाला जाण्यासाठी प्रयत्न करतोय… तसेच या प्रवासात त्याच्यापुढे कोणती आव्हाने उभे ठाकतील, हे देखील पाहण्यासारखे असेल. हिरानींचा चित्रपट हा खास त्यांच्या ट्रेडमार्क शैलीत बनवला गेला आहे ज्यामध्ये भरपूर इमोशन्स देखील असतील.

Shah Rukh Announces His Next Project 'Dunki' With Rajkummar Hirani

रेड चिलीज आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी संयुक्तपणे हा चित्रपट बनवला आहे. यामध्ये पहिल्यांदाच शाहरुख आणि तापसीची जोडी पडद्यावर दिसुन येणार आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.imdb.com/title/tt15428134/

हे पण वाचा : 

EPF कि NPS यापैकी रिटायरमेंटसाठी कोणती योजना चांगली आहे हे समजून घ्या

PM KISAN : 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ??? यामागील कारणे जाणून घ्या

Bank FD : जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा

PNB ने आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Leave a Comment