अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांनंतर सोन्याच्या दरामध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली त्यानंतर मागील आठवड्यात देखील सतत सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळले. आता आज नव्या आठवड्याच्या सुरुवातिला सोन्याच्या दरात काय बदल झाला ? सोडण्याचा दरात घासरण झाली आहे की वाढ ? चला जाणून घेऊया २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट
गुड रिटर्न्स या वेबसाईटवर दिलेल्या सोन्याच्या दराच्या माहितीनुसार आज एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 6,995 रुपये इतका आहे. हा दर काल 6935 रुपये इतका होता. म्हणजेच आज सोन्याच्या एक ग्राम 22 कॅरेट च्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 69 हजार 950 रुपये इतका आहे. हाच दर काल 69,350 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे.
24 कॅरेट
24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7631 रुपये आहे. हाच दर काल 7565 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 66 रुपयांची वाढ झाली आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 76,310 रुपये इतका आहे हाच दरकाल 75 हजार 650 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 660 रुपयांची वाढ झाली आहे.