Masked Aadhaar Card काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे तयार केले जातात; येथे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजकाल प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड आवश्यक बनले आहे. आधार कार्ड हे आयडेंटिटी प्रूफ म्हणूनही सर्वात जास्त ओळखला जाते. बँकेत खाते उघडण्यासाठी किंवा पासपोर्ट काढण्यासाठी, कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा अन्य कामाचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक असते.

आधार कार्डमध्ये एक युनिक 12 अंकी नंबर आहे. या 12 अंकांमध्ये कार्डधारकाच्या ओळखीची पूर्ण माहिती नोंदवली जाते.

अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट्स असल्याने, त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे. आता masked आधार कार्ड येऊ लागले आहेत. यामध्ये तुमचे सुरुवातीचे 8 नंबर masked आधार कार्डमध्ये लपलेले असतात. या संख्या क्रॉस “xxxx-xxxx” ने चिन्हांकित केलेल्या असतात. उर्वरित 4 संख्या उघड असतात.

masked आधार कार्डचा फायदा असा आहे की, जरी तुमचे आधार कार्ड काही हरवले तरी कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही. तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड masked आधार कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकता आणि हे काम ऑनलाईन सहजपणे करता येते. आपण ते आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करू शकता.

अशाप्रकारे डाउनलोड करा masked आधार कार्ड
masked आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइट http://uidai.gov.inवर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर नोंदवावा लागेल.

जर तुमचा मोबाईल नंबर UIDAI मध्ये रजिस्टर्ड असेल तर तुम्ही masked आधार कार्ड असे डाउनलोड करू शकता-
सर्वप्रथम UIDAI च्या वेबसाइट http://uidai.gov.in वर जा.
वेबसाइटवर ‘डाउनलोड आधार’ पर्यायावर क्लिक करा.
आता आधार / व्हीआयडी / नावनोंदणी आयडीचा पर्याय निवडा.
Masked आधारच्या पर्यायावर टिक करा.
येथे आपल्याला काही महत्वाची माहिती एंटर करावी लागेल.
माहिती एंटर केल्यानंतर, ‘Request OTP’ वर क्लिक करा.
तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.
हा OTP एंटर करा.
आणखी काही माहिती इथे टाकावी लागेल.
हे डिटेल्स एंटर केल्यानंतर, ‘आधार डाउनलोड करा’ वर क्लिक करा.
तुम्ही तुमचे Masked आधार डाउनलोड करू शकता.

आधार कार्ड पासवर्डसह उघडले जाईल
आता कोणतेही खाजगी डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. विशेषतः बँक संबंधित डॉक्युमेंट्स मध्ये. डाउनलोड केलेल्या आधार कार्डसाठी तुम्हाला समान पासवर्ड वापरावा लागेल. पासवर्ड काय आहे, तो डाउनलोड फाईलमध्ये रेकॉर्ड केला जातो. पासवर्डमध्ये तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि नंतर जन्म वर्ष असेल.

Leave a Comment