नानांची नवी इनिंग कोणती? : आनंदराव पाटील म्हणाले, अजूनही माझे नेते…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) नवी इनिंग सुरू करणार आहेत. त्यामुळे आता नानाची राजकीय इनिंग नक्की काय असणार याकडे आता राजकीय क्षेत्रातील जाणकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. परंतु याचवेळी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी नांव न घेता आनंदराव पाटील यांनी एक चर्चेत येणारे विधान केले आहे.

कराड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराव पाटील बोलत होते. श्री. पाटील हे रविवारी (दि.19) परगावी असल्यामुळे वाढदिवस साजरा करणार नाहीत, यांची माहिती देण्यात आली. यावेळी उद्योजक आर. टी. स्वामी, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, आप्पा शिंदे आदी उपस्थित होते.

पुढील महिन्यात आनंदराव पाटील हे जिल्ह्यातील सहकारी व कार्यकर्त्याचा एक मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यातून नाना मोठी राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचे बोलले जात असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे नानांची ही नवी इनिंग नक्की काय असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपामध्ये जाहीर प्रवेश करतील असे बोलले जावू लागले आहे. परंतु, नानांच्या नव्या इनिंगच्या चर्चेसोबतच नानांनी एक चर्चेत येणार विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केले आहे. आनंदराव पाटील म्हणाले, अजूनही माझे नेते ‘नो कॉमेंट’ म्हणतात. त्यामुळे मीही नेत्याविषयी ‘नो कॉमेंट’ असे आजही म्हणतो.

रविवारी वाढदिवसा दिवशी आनंदराव पाटील बाहेरगावी
माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यामध्ये मोलाचा वाटा असतो. 19 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस या वाढदिवसादिवशी विविध कार्यक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जातो. परंतु नाना परगावी असल्याने सदर वाढदिवस हा साजरा केला जाणार नाही. नाना परगावी असल्या कारणाने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराड येथे उपलब्ध नाहीत, याची सर्व कार्यकर्ते मित्र मंडळ यांनी नोंद घ्यावी असे आव्हान आनंदराव पाटील (नाना) यांच्या वाढदिवस समितीकडून करण्यात आली आहे.