Pre-Approved Loan म्हणजे काय ??? ते घ्यावे की नाही ??? समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pre-Approved Loan : आर्थिक संकटामध्ये कर्ज मिळाल्याने मोठा आधार मिळतो. अनेक लोकांकडून घर, कार घेण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज घेतले जाते. एकीकडे कर्जासाठी बँकेकडे अनेकदा फेऱ्या देखील माराव्या लागतात. तर दुसरीकडे मात्र बँका काही लोकांना स्वतः हूनच कर्ज देतात.

Basics of pre approved home loans | Housing News

हे लक्षात घ्या कि, बँका कडून फक्त अशाच लोकांना कर्ज दिले जाते जे कर्जाचे हप्ते वेळेवर भरतात. आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि जागरूक लोकं कर्जाची थकबाकी कमी करतात, असा बँकांचा विश्वास आहे. त्यामुळे अनेक बँका कर्ज देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम कर्जदारांशी स्वतः हून संपर्क साधून कर्ज देतात. याला पूर्व-मंजूर कर्ज (Pre-Approved Loan) असे म्हंटले जाते. चला तर मग हे Pre-Approved Loan च्या ऑफर्स काय आहेत ??? ते घ्यावे कि नाही ??? हे समजून घेउयात ….

Guide to Pre-approved Personal Loans - Finance Buddha Blog | Enlighten Your  Finances

Pre-Approved Loan म्हणजे काय ???

जर एखाद्या बँकेकडून आपल्याला Pre-Approved Loan ऑफर केले जात असेल तर याचा अर्थ असा आहे की, सदर बँकेकडे आपल्याबद्दलची माहिती आधीचपासूनच आहे. याअंतर्गत, बँकांकडे सहसा कर्जदाराच्या क्रेडिट योग्यतेची माहिती आधीपासूनच असते. उदाहरणार्थ, बँकांना आपला क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न याबद्दलची माहिती असते. मात्र, त्यांना आपल्या परतफेडीची क्षमता आणि सध्याच्या उत्पन्नाची स्थिती पडताळण्यासाठी ITR रिटर्न आणि लेटेस्ट इनकम प्रूफ यांसारख्या कागदपत्रांची गरज भासू शकते.

याबरोबरच आपल्याला Pre-Approved होम लोन, कार लोन, बाईक लोन आणि पर्सनल लोनसाठी ऑफर मिळू शकतात. मात्र त्यासाठी थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. कारण अनेकदा Pre-Approved Loan च्या नावाखाली फसवणुक देखील केली जाते. इथे हे लक्षात घ्या कि, ज्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनाच अशा प्रकारच्या कर्जाची ऑफर मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बहुतेक Pre-Approved Loan हे हाय क्रेडिट स्कोअर, झिरो लोन डिफॉल्ट हिस्ट्री, ITR द्वारे जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींनाच दिले जातात.

Everything you want to know about pre-approved loan

सर्वांत आधी कर्जाची ऑफर तपासा

कोणतीही बँका किंवा वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांना सहसा ईमेल, व्हॉट्सएप मेसेज, एसएमएस यांसारख्या माध्यमांद्वारे आणि ग्राहकाच्या मोबाइल / ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे ऑफरबद्दलची माहिती देतात. याशिवाय बँकेच्या कस्टमर सपोर्ट टीम कडून देखील आपल्याला कॉल येऊ शकेल. तसेच आपल्या लोन एग्रीगेटरला ऑनलाइन भेट देऊनही Pre-Approved Loan च्या ऑफर्स मिळू शकतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/pre-approved-personal-loan-offer

हे पण वाचा :

FD-RD अन् PPF वरील व्याजावर Tax द्यावा लागेल का ???

FD Rates : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीनदर तपासा

PAN-Aadhaar Link करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस !!! त्यासाठीची प्रक्रिया पहा

आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!

Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा

 

Leave a Comment