TAN Card म्हणजे काय ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅन कार्डची माहिती आपल्या सर्वांकडेच आहे. मात्र आपण कधी TAN Card बाबत काही ऐकले आहे का ??? बर्‍याचदा लोकांना पॅन कार्ड आणि टॅन कार्डमधील फरकच समजत नाही. त्यांना ते एकसारखेच वाटतात. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही वेगवेगळे आहेत. तसेच ते वेगवेगळ्या हेतूंसाठी वापरले जातात. तर आजच्या या बातमीमध्ये आपण या दोघांमधील फरक आणि त्यांच्या वापराविषयीची माहिती जाणून घेयूयात…

हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केले पॅन कार्ड हे एक अत्यन्त महत्वाचे डॉक्युमेंट आहे. जे आता बँकिंगशी संबंधित अनेक कामांमध्ये बंधनकारक केले गेले आहे. विशेषतः नोकरदार वर्गासाठी तर ते खूपच महत्वाचे आहे. पॅनकार्डद्वारे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून लोकांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र TAN Card याहून जरा वेगळे असते.

What is TAN card | Paytm Blog

TAN कार्ड म्हणजे काय ???

TAN चा फुल फॉर्म Tax Deduction and Collection Account Number आहे. PAN प्रमाणेच TAN Card देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केले जाते. यामध्येही 10 अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. कर कपात किंवा जमा करणार्‍या सर्वांसाठी ते बंधनकारक आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर पॅन कार्ड हे करदात्यांसाठी बनवले जाते तर TAN कार्ड हे कर कपात करणाऱ्यांसाठी बनवले जाते. हे अशा लोकांसाठी आहे जे काही कामाच्या बदल्यात पैसे देतात आणि टॅक्स कापून पैसे देण्याची जबाबदारी त्यांच्यवर येते. हे लक्षात घ्या कि, यासाठी एक कॅटेगिरी बनवण्यात आली आहे ज्या अंतर्गत येणार्‍या लोकांना किंवा कंपन्यांना TAN घेणे बंधनकारक आहे.

TAN Card क्या है, कैसे बनवाएँ, TAN Number के लिए कौन आवेदन कर सकता है? -

PAN पेक्षा TAN वेगळे कसे ???

PAN म्हणजे परमनंट अकाउंट नंबर तर TAN म्हणजे टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर. टॅक्सशी संबंधित सर्व कागदपत्रांसाठी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी संबंधित सर्व प्रकारच्या टॅक्ससाठी TAN नंबर देणे बंधनकारक आहे.

Income Tax Department conducts searches in Uttar Pradesh | DD News

TAN कार्डसाठी अर्ज कसा करता यईल ???

TAN Card साठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. यामध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. जिथे TAN साठी फॉर्म 49B भरावा लागेल. यासोबतच 62 रुपयेही द्यावे लागतील. पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा नेट बँकिंग इत्यादींपैकी कोणताही पर्याय निवडता येईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/tan-tds.aspx#:~:

हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Multibagger Stock : ‘या’आर्टिफिशियल ज्वेलरी कंपनीने 12 दिवसांत गुंतवणूकदारांना दिला चार पट नफा !!!
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या