हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । overdraft facility : आर्थिक संकटाच्या काळात आपल्याला अनेकदा पैशांची गरज भासते. त्याअशावेळी आपण सहजपणे पैसे मिळतील आणि व्याज देखील कमी द्यावे लागेल असे पर्याय शोधतो. यासाठीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पर्सनल लोन. मात्र हे लक्षात असू द्यात कि, पर्सनल लोनसाठी कोणतीही गॅरेंटी लागत नाही. मात्र त्यावर जास्त व्याजदर द्यावा लागतो. आज आपण बँकिंगच्या एका अशा पर्यायाबाबत जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपली पैशांची गरज सहजपणे पूर्ण होऊ शकेल. या सुविधेचे नाव आहे बँकेची ओव्हरड्राफ्ट सुविधा (overdraft facility).
खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही बँकांकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. बहुतेक बँकांकडून करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि FD वर ही सुविधा दिली जाते. मात्र काही बँका शेअर्स, बाँड्स आणि इन्शुरन्स पॉलिसींसारख्या मालमत्तेवर देखील overdraft facility देखील देतात. या सुविधेअंतर्गत, आपल्याला बँकेतून हवे तितके पैसे घेता येतात आणि नंतर परत करता येतात.
ओव्हरड्राफ्टची सुविधा कशी मिळवावी ???
जर आपण बँकेत FD केली नसेल तर सर्वांत आधी बँकेमध्ये कोणतीही मालमत्ता गहाण ठेवावी लागेल. त्यानंतर बँकेकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल. आजकाल अनेक बँकाकडून त्यांच्या ग्राहकांना आधीच overdraft facility दिली जाते. सॅलरी असलेल्या लोकांना सहजपणे ओव्हरड्राफ्ट मिळतो.
किती पैसे घेता येतील ???
overdraft facility अंतर्गत किती पैसे मिळतील हे बँकेकडून ठरवले जाते. तसेच या सुविधेसाठी बँकेत तारण म्हणून काय ठेवले आहे यावर देखील मर्यादा अवलंबून असते. तसेच सॅलरी आणि एफडीच्या बाबतीत बँकाकडून जास्त मर्यादा ठेवली जाते. उदाहरणार्थ, जर बँकेत आपण 2 लाख रुपयांची एफडी केली असेल तर बँकेकडून ओव्हरड्राफ्टसाठी 1.60 लाख रुपयांची (80%) मर्यादा दिली जाऊ शकेल. शेअर्स आणि डिबेंचर्सच्या बाबतीत ही मर्यादा 40 ते 70 टक्के असू शकेल.
व्याज दर किती असेल ???
आपल्याला किती व्याज दर मिळेल, हे आपण ज्या मालमत्तेवर overdraft facility देण्यात आली आहे त्यावर अवलंबून असेल. मात्र आपण बँकेतून ज्या कालावधीसाठी पैसे घेतो त्यानुसार व्याज द्यावे लागेल. याचाच अर्थ असा की जर आपण 25 डिसेंबरला पैसे घेतले आणि 25 जानेवारीला त्याची परतफेड केली तर फक्त एक महिन्याचेच व्याज द्यावे लागेल. मात्र जर ही सुविधा FD वर घेतली असेल, तर व्याजदर FD वरील व्याजापेक्षा 1 ते 2 टक्के जास्त राहील. त्याच बरोबर शेअर्ससह इतर मालमत्तेच्या बाबतीत व्याज दर थोडा जास्त असू शकेल.
ओव्हरड्राफ्ट घेण्याचा फायदा काय आहे ???
क्रेडिट कार्ड किंवा इतर पर्सनल लोनच्या पेक्षा हे खूपच स्वस्त असेल. यामध्ये तुलनेने कमी व्याज द्यावे लागेल. याचा दुसरा फायदा असा की, overdraft facility मध्ये आपण ज्या कालावधीसाठी पैसे घेतो तेवढ्याच कालावधीसाठी व्याज द्यावे लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/save/od-facility-in-current-account
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!
SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या
शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!