हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या संपूर्ण देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरी केला जाईल. प्रत्येकजण आपापल्या आवडत्या व्यक्तीला किंवा जोडीदाराला प्रेमाची कबुली देईल. उद्याचा हा खास दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरी केला जाईल. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की 14 तारखेलाच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? तसेच हा दिवस साजरी करण्यामागे नेमके कारण तरी काय आहे? नसेल माहित तर जाणून घ्या.
व्हॅलेंटाईन डेची (Valentine’s Day) सुरुवात कशी झाली?
या दिवसाची सुरुवात रोम देशातून झाली. या देशांमध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचे एक धर्मगुरू होते. जगात प्रेम आहे, प्रेम हेच जीवन आहे यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. परंतु तिथल्या रोमन राजाला हे मान्य नव्हते. तो याला तीव्र विरोध करायचा. या राजाला असे वाटायचे की, प्रेम आणि विवाह पुरुषाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतात. यामुळेच राजाचे सैनिक देखील लग्न करू शकत नव्हते.
परंतु दुसऱ्या बाजूला राजाच्या या विचारांना आणि आदेशांना जुमानत संत व्हॅलेंटाईन यांनी लोकांना प्रेम करण्यास आणि विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. यातूनच प्रेरित होऊन अनेक सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी लग्न करून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. यामुळे राजा व्हॅलेंटाईन यांच्यावर प्रचंड संतापला. शेवटी त्याने 14 फेब्रुवारी इसवी सन पूर्व 269 रोजी संत व्हॅलेंटाईन यांना फाशी दिली. तेव्हापासून हा दिवस व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) म्हणून साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईन नाव कसे आले?
संत व्हॅलेंटाईन यांनी शिक्षा भोगण्याअगोदर अंध मुलगी जेकोबस हिला आपले डोळे दान करत एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी तिला ‘युअर व्हॅलेंटाइन’ असे म्हटले होते. तेव्हापासून व्हॅलेंटाईन हे नाव देखील समोर आले. यामुळेच व्हॅलेंटाईन डे दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला भेट वस्तू देतात प्रेम व्यक्त करतात.