जाणून घ्या वजन कमी करण्याचा 30-30-30 चा फॉर्मुला; महिन्याभरात चरबी होईल कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत. यामुळे त्यांच्या अनेक शारीरिक व्याधी देखील वाढलेल्या आहे. त्यातही लठ्ठ हे एक मोठे आव्हान आहे. लोकांची बैठी जीवनशैली कमी हालचाली यामुळे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे. एकट्या भारतामध्ये 13.5 कोटी लोक लठ्ठपणाला त्रस्त आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय करत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी 30 – 30 – 30 चा फॉर्मुला सांगणार आहोत. या फॉर्मुलाचे जर तुम्ही पालन केले, तर नक्कीच तुमचे वजन कमी होईल.आणि तुम्ही निरोगी आणि मजबूत बनाल. सोशल मीडियावर देखील अनेकदा या फॉर्म्युलाचा वापर करून लोकांनी वजन कमी केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही अगदी महिन्याभरातच या फॉर्मुलाचे नीट पालन केले तर वजन कमी करू शकता.

पोट भरून खा

आपण आपल्या शरीराला जेवढे लागते तेवढे अन्न खाणे खूप गरजेचे असते. अन्न नीट चावून खाल्ल्याने आपली पचन संस्था देखील निरोगी राहते. तसेच वजन कमी करणे देखील सोपे होते. याला माईंडफुलईटिंग असे म्हणतात. तसेच जेवताना टीव्ही मोबाईल या सगळ्या गोष्टी पासून लांब राहा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.

कॅलरीजचे सेवन कमी करा

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे कॅलरी कमी करणे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही 30 – 30 – 30 चा नियम वापरू शकता. यामध्ये तुम्ही दररोज 30 टक्के कॅलरीज कमी करू शकतात. आणि सहज वजन तुम्ही कमी करू शकता. दररोज तुम्हाला 2000 कॅलरीची आवश्यकता असेल, तर त्यावेळी तुम्ही केवळ 1400 कॅलरीज खा. तुम्ही या कॅलरीज हळूहळू कमी केल्या पाहिजे, जर तुम्ही एकदम कॅलरीज कमी खाल्ल्या तर तुमच्या शरीराला नुकसान पोहोचेल. तसेच पोषक तत्त्वांचा आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

नियमित व्यायाम

वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त जीवनासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही दिवसातून फक्त 30 मिनिटाचा व्यायाम करू शकता. त्यामुळे तुमच्या कॅलरी बर्न होतील. तसेच तुमचा मूड देखील चांगला होईल आणि तुमचे आरोग्य देखील सुधारेल. यासाठी तुम्ही चालणे, धावणे सायकलचा चालवणे. यांसारखे व्यायाम करू शकता. असे केल्याने तुमच्या कॅलरीज कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही झपाट्याने वजन कमी करू शकता.