हाडे मजबूत ठेवायची असल्यास ‘या’ गोष्टीचा आहारात करू नये समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. लहान वयातील लोकांना सुद्धा हाडाचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्याची हाडे मजबूत नसतात. त्याची कारणे अनेक वेगवेगळी आहेत. सध्या लोकांच्या धावपळीमुळे आपल्या आहाराकडे लोकांचे अजिबात लक्ष नसते. त्यामुळे जितक्या मोठ्या प्रमाणात बाहेरच्या वस्तू खाता येतील याचा विचार सर्वसामान्य लोक करत असतात. निरोगी शरीरासाठी जसे योग्य आहार आणि योग्य प्रकारचा व्यायाम गरजेचं असते. याच कारण आपण रोजच्या जीवनातील खाद्यपदार्थ. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होऊन त्यांची दुखणी वाढतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे होतं हाडांचं नुकसान…

आजकाल लहान मुलांपासून सगळ्या लोकांना कार्बन डायऑक्सडाइड युक्त पेय जास्त आवडतात. कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरसचं प्रमाणं जास्त असतं. ज्यामुळे आपल्या हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिक्स पिणं शक्यतो टाळावं. चहा आणि कॉफी मध्ये सुद्धा कॅफिन चे प्रमाण जास्त असते. चहा आणि कॉफीचं जास्त प्रमाणातील सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकरक असतं. यातील कॅफीन हाडांना ठिसूळ बनवतं. अल्कोहोलच्या सेवनानं शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे हाडांची झीज होते आणि परिणामी हाडांची दुखणी वाढतात. अनेक व्यसने सुद्धा हाडे ठिसूळ बनवण्याचे काम करतात.

आयोडीन युक्त मीठ हे आपल्या शरीरासाठी चांगले असते. आपल्या आहारात मीठाचं अतिसेवन शरीरासाठी घातक असतं. मिठाचे जास्त प्रमाणातले सेवन हे योग्य नसून ते आपल्या शरीरावरील हाडांच्या मजबूतीवर थेट परिणाम करते. मीठामध्ये सोडियमचं प्रमाणं जास्त असतं. त्यामुळे हे शरीरात गेल्यावर हाडांमधील कॅल्शियम यूरीनमधून शरीराबाहेर टाकलं जातं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment