Wednesday, February 8, 2023

आईने असं काय केलं की, 13 वर्षीय मुलीने घेतला गळफास

- Advertisement -

औरंगाबाद | दहा रुपये न दिल्यामुळे रागाच्या भरात 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन 13 मधील वानखेडे नगरात शुक्रवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहिनी सुनील शेजवळ असे मृत मुलीचे नाव असून मोनिकाचे आई वडील, भाऊ दोन वर्षापासून वानखेडे नगर येथे किरायाच्या घरात राहत होते. तिचे वडील बांधकाम मिस्त्री तर आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. शुक्रवारी रात्री सात वाजता मोहिनीने आईकडे दहा रुपये मागितले असता आईने दहा रुपये सुट्टे नाही उद्या तुला पैसे देते असं सांगितले. यानंतर आई घर कामात व्यस्त झाली. नंतर मोहिनी शेजारच्या खोलीत गेली आणि पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. आठ वाजून पंधरा मिनिटांनी आई शेजारच्या खोलीत गेली असता त्यांना मोहिनीने गळफास घेतलेला आढळला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारचे लोक धावत आले.

- Advertisement -

पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने मोहिनीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी मोहिनीला घाटी रुग्णालयात नेण्यास सल्ला दिला परंतु रात्री साडेअकरा वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोहिनीला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.