म्हातारपणी पैशांची कमतरता भासू नये यासाठी काय करावे ? चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । म्हातारपणी पैशांची कमतरता भासू नये असे वाटत असेल, तर खास प्लॅनिंग करून तुमची गुंतवणूक मॅनेज करावी लागेल. जर आयुष्यभराचे भांडवल म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि ग्रॅच्युइटीचे योग्य मॅनेजमेंट केले, तर रिटायरमेंटनंतर तुम्ही वृद्धापकाळासाठी आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकता.

बँक बझारचे सीईओ आदिल शेट्टी म्हणतात की,”तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासोबतच तुमच्या सर्व आर्थिक दायित्वांचाही लवकर निपटारा करावा लागेल. जर तुम्ही होम लोन, कार लोन किंवा इतर कोणतेही लोन घेतले असेल तर ते लवकर फेडा. तुम्ही तुमच्या PF आणि ग्रॅच्युइटीची रक्कम एकरकमी भरण्यासाठी वापरू शकता किंवा नियमित प्री-पेमेंटची निवड करू शकता.

EPF खात्यात पैसे वाढू द्या
सध्या डेट फंडातील EPF वर सर्वाधिक 8.5 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. शेवटच्या कामकाजी दिवसानंतर, तुमच्या EPF मध्ये जमा केलेल्या पैशावर 36 महिन्यांसाठी व्याज मिळते म्हणजेच तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत काम केले असेल, तर 2021-22, 2022-23 आणि 2023-24 या तीन आर्थिक वर्षांसाठी हे खाते बंद होण्यापूर्वी EPF खात्यात जमा केलेल्या पैशांवर व्याज उपलब्ध असेल. EPF खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळते. अशा परिस्थितीत, जर मोठी गरज नसेल, तर EPF फंडातून पैसे काढू नका.

उच्च जोखमीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवू नका
तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुमचे पैसे वेगवेगळ्या ऍसेट्स क्लासमध्ये गुंतवा. याचा अर्थ असा की, जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत नसाल तर जास्त रिटर्नमुळे उच्च जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे टाळा. यासाठी तुम्ही कमी जोखीम असलेली डेट ओरिएंटेड प्रॉडक्ट्स निवडू शकता. यासाठी तुम्ही पीपीएफ, म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड एडव्हांटेज स्कीम्स, डेट ओरिएंटेड हायब्रीड म्युच्युअल फंड स्कीम आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग्जमध्ये एकरकमी गुंतवणूक यासारखे पर्याय निवडू शकता.

एमर्जन्सी फंड तयार करा, हेल्थ इन्शुरन्स खरेदी करा
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी एमर्जन्सी फंड तयार करा. रिटायरमेंटनंतर तुमच्याकडे किमान 5 लाख रुपये रोख स्वरूपात त्वरित उपलब्ध असावेत. त्यासाठीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. हे पैसे कोणत्याही मेडिकल एमर्जन्सीसाठी किंवा इतर कोणत्याही विशेष गरजांसाठी वापरले जाऊ शकतात. हे पैसे नियमित बँक ठेवी किंवा लिक्विड म्युच्युअल फंड योजनांमध्ये ठेवता येतात. वैद्यकीय खर्चाबाबत दुसरी तयारी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. तुमच्याकडे चांगली कव्हरेज असलेली हेल्थ पॉलिसी असणे आवश्यक आहे जेणेकरून वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक भार वाढू नये.

Leave a Comment