हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र या अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्हाला कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर ही ओळखीची कागदपत्रे असणे खूप गरजेचे असतात. ही कागदपत्रे तुम्हाला सरकारद्वारे दिली जातात. आपण भारतातील रहिवासी आहोत तसेच आपल्या ओळखीचा पुरावा या कागदपत्रांमध्ये असतो. या ओळखपत्रावर आपला फोटो, लिंग, जन्मतारीख आपला फोन नंबर, तसेच पत्ता यांसारख्या गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे ही कागदपत्र असणे खूप गरजेचे आहे.
परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यावेळी त्यांच्या या कागदपत्रांचे नक्की काय होते? हे आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक वेळा जर व्यक्ती हयात नसेल, तर त्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा अनेक लोक चुकीचा वापर करतात. आधार कार्डवर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. अनेक लोक पत्त्याच्या पुरावासाठी हे वापरतात. आधार कार्ड अनेक प्रत्येक कामामध्ये आपल्याला उपयोगी पडते.
आधार कार्ड हे रद्द करण्याची तरतूद कुठेही दिलेली नाही. त्याचप्रमाणे मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड असणे देखील गरजेचे नाही. परंतु त्या मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होणार नाही. याची काळजी त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घेणे खूप गरजेचे असते. त्याचप्रमाणे बँक आणि डिमॅट खाती घालवण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक असते.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड हे सरेंडर करणे देखील बंधनकारक नाही. परंतु मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्या आधार कार्डची तसेच पॅन कार्डची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोक त्याचा चुकीचा वापर करू शकतात. परंतु मतदार ओळखपत्र बाबत हा नियम नाही. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर त्याचे मतदान ओळखपत्र करण्याची प्रक्रिया आ.हे 1966 च्या मतदार नोंदणी नियमानुसार मृत व्यक्तीचे मतदार ओळखपत्र हे रद्द केले जाते.