यांचं करायचं काय …? पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समितीत गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन

करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात कालपासून (14एप्रिल ) पासून ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यात जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आलेली आहे. अन्नधान्य भाजीपाला यांचा समावेश हा जीवनावश्यक वस्तू मध्ये होतो. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना नियमानुसार सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या ही पुणे जिल्ह्यात असताना पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेली गर्दी अधिकच परिस्थिती भयानक करेल की काय अशी भीती निर्माण करते आहे. यावेळी नियमाचे पालन करीत जवळपास सर्वांच्याच नाकाला मास्क आणि रुमाल बांधलेले होते. मात्र काहीजणांच्याकडे पाहून मास्क नाकाला की फक्त्त तोंडाला बांधण्यासाठी असतो असा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती होती. बहुतेक जणांचे मास्क असूनही ते नीट घातले गेलेले नव्हते.

राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती मुभा देऊन निर्बंध घातले आहेत. पण पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमाधील दृश्य पाहून नियम नक्की कोणासाठी आहेत असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

दरम्यान पुणे मनपा हद्दीत एक्टिव्ह असलेल्या एकूण ५३ हजार ३२६ कोरोनाबाधितांपैकी ८ हजार २९३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून ४५ हजार ०३३ कोरोनाबाधित गृह विलगिकरणात आहेत.ही आकडेवारी बुधवार १४ एप्रिल, ची आहे. बुधवारी नव्याने 206 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुण्यातील एकूण बाधित रुग्नांची संख्या 3 लाख 44 हजार 29 इतकी झाली आहे. तर बुधवारी एकूण 46 रुग्णांचा कोरोनामुळे पुण्यामध्ये मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत पाच हजार 902 जण कोरोनामुळे पुण्यात दगावले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment