गद्दारांना क्षमा नाही..!! धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिष्याने गद्दारी केली तर शिवसेना काय करणार?

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शिवसेना पक्षातील अंतर्गत बंडाळीने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. पक्षफुटीच्या या मार्गावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळत आहे. अशा प्रसंगी काही दिवसापूर्वी शिवसेनेचे निष्ठावंत आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट आला, त्यामध्ये त्यांचा एक डायलाॅग आहे, “गद्दारांना क्षमा नाही” या डायलाॅगची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी वेगळे पाऊल उचलल्यास शिवसेनेची काय भूमिका असणार याकडेही राजकीय वर्तूळात लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना पक्षाने गेल्या अडीच वर्षापूर्वी काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली. या आघाडीला महाविकास आघाडी असं नाव देण्यात आलं. सत्तेच्या समीकरणात वजा झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेकदा प्रयत्न केले. महाविकास आघाडीत असलेले अंतर्गत वाद हे त्याचं मुख्य कारण. काही दिवसांपूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार यांना अनपेक्षितपणे पराभव पत्करावा लागला. काल विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीत मतभेदामुळे जवळपास 21 मते फुटली. या निकालानंतर परिवर्तनाची सुरूवात झाल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले होते. निकालानंतर काही वेळातच नाराजीनाट्य सुरू झाले, अन् चक्क शिवसेनेचे विश्वासू एकनाथ शिंदे डझनभराहून अधिक आमदार घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या गुजरातमध्ये रात्रीत दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला. परंतु या सर्व घडामोडीत आता “गद्दारांना क्षमा नाही”  या डायलाॅगची शिवसेनेत मोठी चर्चा सुरू आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या पावित्रामुळे राजकीय उलथापालथ होवू लागली आहे. या पावित्रामुळे शिवसेनेने गटनेते पदावर अजय चाैधरी यांची नियुक्ती केली आहे. अशावेळी गुजरातमध्ये भाजप पक्षाकडूनही राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत, मात्र या सर्व हालचाली या शिवसेनेच्या अंतर्गत चर्चेवर विसंबून ठेवलेल्या आहेत. जोपर्यंत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेतेमंडळी यांची चर्चा होत नाही, तोपर्यंत भाजप आपले पत्ते खुले करणार नाहीत असे दिसत आहे. भाजपकडून कोणतीही सत्ता स्थापनेसाठी किंवा शिवसेनेच्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य करण्यात आले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या व शिवसेनेच्या भूमिकेकडे भाजपाचे लक्ष लागून असले तरी निर्णयाची वाट पहात आहेत. त्यामुळे शिवसेनेशी सुरू असलेल्या या राजकीय नाट्यावर ठाणेचे दिवगंत नेते आनंद शिंदे यांच्या धर्मवीर चित्रपटातील डायलाॅग मोठा चर्चेला जावू लागला आहे.

गद्दारांना माफी नाही, डायलाॅग मागची खरी कहाणी 

मार्च 1989 मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निवडुण आले होते. यावेळी शिवसेनेंने जनता पक्षासोबत मिळवणी करत महापौर पदावर दावा केला. पण महापाैर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आणि उपमहापौर पदही दोन मताने गेले. यामध्ये काॅंग्रेसने बाजी मारली. पण यातूनच शिवसेनेचे नगरसेवक फुटले होते, हे स्पष्ट दिसून येऊ लागले होते. त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. या घटनेवर समाज माध्यमामध्ये बोलताना त्यांनी गद्दारांना माफी नाही असे म्हटले होते. काहीच दिवसानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची तलवारीने हत्या करण्यात आली. त्यांनीच काॅंग्रेसला मतदान केले होते आणि यामुळे आनंद दिघेंनी त्यांचा खून केला या प्रकरणामध्ये आनंद दिघेंवर टाडा लावण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आले होते ते आणि जामिनावर बाहेर होते. हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालया पर्यंत पोहचले होते. परंतु त्यांच्या मृत्यूपर्यंत हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही, असे म्हटले जाते.