कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा येथे गुरूवारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर ना. शंभूराज देसाई यांनी केवळ महाविकास आघाडीच्या बदनामीसाठी चित्रा वाघ स्टेटमेंट करत असल्याचे सांगितले. मात्र यानंतर आज शुक्रवारी 2 जुलै रोजी चित्रा वाघ यांन एक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी शंभूराज देसाई यांना सातारचे पालकमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. तसेच साताऱ्यातील पालकमंत्री म्हणून त्यांना जाब विचारताना पुणे येथील बातमी ट्विटमध्ये पोस्ट केली आहे. तेव्हा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा असणाऱ्या चित्रा वाघ या साताऱ्यातून येऊन गेल्यानंतरही सातारचे पालकमंत्री नक्की कोण आहे, यांची माहीती नसल्याचे दिसून येत आहे.
अरे हे काय चाललयं..@DesaiShambhuraj रोज पॉक्सोच्या घटनाहेत
तुम्ही पालकमंत्री असलेल्या सातार्यातं २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार शिक्षीकेकडे शरीरसुखाची मागणी असल्या गलीच्छ घटना आणि कसल्या बाता मारतायं हो तुम्ही
१ ओळीची स्टेटमेंट नाही तुमची
जनतेला कळू द्या आहात तुम्ही गृहराज्यमंत्री pic.twitter.com/Zr1TqtjvP8— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 2, 2021
गृहराज्यमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी कालच साताऱ्यातील महिलावरील अत्याचारात कमी असल्याचे सांगितले होते. तसेच चित्रा वाघ या केवळ महाविकास आघाडीला बदनाम करत असल्याचे सांगत शंभूराज देसाई यांनी त्यांच्या टिकेवर भाष्य टाळले होते. तेव्हा चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विटद्वारे आपले भूमिका मांडली आहे.