बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने अख्या महाराष्ट्राला हळहळायला लावलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा बीडमध्ये दोघाजनांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल एक दोन नव्हे तर नऊ जणांनी मिळून दोघांना मारहाण केल्याची ही घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण सध्या पसरलेला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे चला पाहूया
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 27 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता कुंटेफळ तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील सर्विस रोडवर बस स्टॅन्ड जवळ घडली आहे याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण ?
प्रशांत बापू चौधरी (वय २२ रा . कुंटेफळ ,ता . आष्टी ) हे त्यांचे चुलत भाऊ भाऊसाहेब चौधरी हे २७ एप्रिलला रुईछत्तीशी येथून बाजार करून घरी येत होते. यावेळे मित्र दीपक कराळे याची वाट पाहत ते थांबले होते. बस स्टॅन्डच्या आडोशाला त्यांचे लघुशंका केल्याने त्यावेळी नारायण कोळेकर यांनी त्यांच्यवर आक्षेप घेतला. ” येथे लघुशन्का करायची जागा आहे आहे का ? असा जाब विचारला इथे आमच्या बायका असतात” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर प्रशांत यांनी आपली चूक मान्य करत मागितली. मात्र नारायण आणि त्यांचा भाऊ बाळासाहेब कोळेकर यानॆ लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली.
ही गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर नारायण सोमनाथ चितळकर याना फोन करून बोलावून घेतले. शिवाय सुशील चिथळकर, धरम महानोर, सोन्या उल्हारे ,अजय साबळे, दुर्गेश साबळे आणि इतर ७-८ जण लोखंडी रॉड ,लोखंडी गज , आणि लाकडी दांडके घेऊन त्या ठिकाणी आले. या टोळक्याने प्रशांत आणि भाऊसाहेब यांना बेदम मारहाण केली. सोमनाथ आणि नारायण यांनी भाऊसाहेब याला खाली पडून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तर प्रश्नातला लोखण्डी गजाने डोक्यावर आणि पाठीवर जबरी मारहाण करण्यात आली. या घटनेत भाऊसाब बेशुद्ध झाले.
प्रश्नतने आरडाओरड केल्यानंतर त्याचा चुलत भाऊ वेदांत चौधरी आणि मित्र दीपक कराळे घटनास्थळी पोहचले. त्यांनाही या टोळक्याने लोखंडी रॉडने डोक्यात आणि हातावर मारहाण केली. त्यामुळे वेदांत याच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली . शिवाय दीपक यालाही मारहाण करून धमकावण्यात आले. नारायण कोळेकर याच्या पत्नीने दगडाने वार करून वेदांत याचा मोबाईल फोडला. तर बाळासाहेब कोळेकर याने प्रशांतची सोन्याची अंगठी बाळाबरीने काढून घेतली.
मारहाणीनंतर टोळक्याने खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना बोलावलं मात्र पोलिसांनी प्रशांत, भाऊसाहेब, वेदांत आणि दीपक यांना गंभीर अवस्थेत अहमदनगर येथील सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रशांत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर,सोमनाथ चितळकर, सुशील चितळकर, महानोर, अजय साबळे, दुर्गेश साबळे आणि नारायण कोळेकर यांच्या पत्नीसह सात ते आठ अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
संतोष देशमुख प्रकरण
खरंतर संतोष देशमुख यांना देखील 9 डिसेंबर 2024 रोजी टोळक्यांना अपहरण करून अमानुष मारहाण केली होती. हा हल्ला देखील बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कुरवते सारखाच आहे असं मानलं जात आहे. संतोष यांच्या हत्येतील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेने बीडमध्ये कायदा आणि सुव्यचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.