नवी दिल्ली । मेसेज एक्सचेंज प्लॅटफॉर्म WhatsApp ने 20 लाख भारतीय खाती ब्लॉक केली आहेत. कंपनीला ऑगस्टमध्ये 420 तक्रारींशी संबंधित रिपोर्ट मिळाला, ज्याच्या आधारे त्यांनी हे पाऊल उचलले. WhatsApp ने आपल्या अनुपालन रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.
त्याचवेळी, सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ऑगस्ट महिन्यात नियमांच्या 10 उल्लंघनाच्या श्रेणींमध्ये 3.17 कोटी कंटेन्टवर कारवाई केली. WhatsApp ने मंगळवारी जारी केलेल्या ताज्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात त्यांनी 20,70,000 भारतीय खाती ब्लॉक केली आहेत.
WhatsApp ने यापूर्वीच म्हटले होते की, ज्या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे त्यापैकी 95 टक्क्यांहून अधिक खाती त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मेसेजेसचा अनधिकृत वापर केल्यामुळे होती. जागतिक स्तरावर, WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मच्या गैरवापरासाठी दरमहा सरासरी 80 लाख खाती ब्लॉक केली आहेत.
या व्यतिरिक्त, फेसबुकने शुक्रवारी जारी केलेल्या आपल्या अनुपालन रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,” त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये 3.17 कोटी कंटेन्टवर प्रक्रिया केली आहे. यात इन्स्टाग्रामने या काळात नऊ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर असलेले 22 लाख कंटेन्ट काढले किंवा त्यावर कारवाई केली.
फेसबुकने म्हटले आहे की,”त्यांना 904 युझर्सचे रिपोर्ट 1-31 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे मिळाले आहेत. त्यापैकी 754 प्रकरणे निकाली काढण्यात आली.” कंपनीने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,”यापैकी 30 कोटींहून अधिक कन्टेन्टमध्ये स्पॅम (2.9 कोटी), हिंसक आणि रक्तपात (2.6 कोटी), नग्नता आणि लैंगिकता (20 लाख), द्वेषयुक्त भाषण (242,000) इत्यादींचा समावेश आहे.