Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार

Whatsapp Features
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | whatsapp आपल्या यूजर्सचा अनुभव सतत वेगवेगळ्या फीचर्सवर काम करत असते . आता व्हॉट्सअॅप आपले मेसेज डिलीट फीचर अपडेट करणार आहे. यापूर्वी आपण कोणताही मेसेज delete for everyone करायचं असेल तर त्यासाठी फक्त 1 तास 8 मिनिटांचा अवधी होता. मात्र आता नवीन फीचर्स नुसार हा कालावधी 2 दिवसांपर्यंत वाढवण्यात येईल.

WABetaInfo च्या रिपोर्ट्सनुसार, व्हाट्सअप्प ने आपल्या युजर्स साठी मेसेज डिलीट करण्याची मर्यादा 2 दिवस 12 तासांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपने लेटेस्ट बीटा २.२२.१५.८ च्या काही यूजर्सना या अपडेटचा फायदा होईल.सध्या ही मर्यादा 1 तास 8 मिनिटे इतकी आहे. त्यानंतर मेसेज डीलीट फॉर एव्हरीवन या फीचरद्वारे डीलीट करता येऊ शकत नव्हता. मात्र आता 2 दिवसानंतर देखील तुम्ही मेसेज डिलीट करू शकाल.

याशिवाय whatsapp मेसेजिंग अॅप एका फीचरवरही काम करत आहे ज्यामुळे ग्रुप अॅडमिन्स ग्रुपमधील कोणताही मेसेज डिलीट करू शकतील. भविष्यातील अपडेट्सनंतर ही सुविधा whatsapp वर उपलब्ध होईल. मात्र, हे फीचर कधी येणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सध्या हे फीचर टेस्टिंगच्या टप्प्यात आहे.