हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे सोशल मिडीयावरील प्रायव्हसी संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. परंतु ही प्रायव्हसी जपण्याचे काम सातत्याने व्हॉट्सअॅप करत आले आहे. आता देखील याच संदर्भात व्हॉट्सअॅपने एक नवीन फिचर लाँच केले आहे. ‘फोन नंबर प्रायव्हसी’ असे या फिचरचे नाव आहे. या नवीन फिचर संदर्भात WABetainfo या वेबसाईटने माहिती दिली आहे. ‘फोन नंबर प्रायव्हसी’ हे नंबरची प्रायव्हसी जपण्याचे काम करते. म्हणजेच की, तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी झाला तर हे फिचर इतरांना तुमचा नंबर दाखवत नाही. किंवा तो कोणाला दिसत देखील नाही.
जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचे असेल तर तो तुम्हाला रिक्वेस्ट पाठवू शकतो. मात्र ही रिक्वेस्ट स्विकारणे पुर्णपणे तुमच्या हातात असते. यामुळे तुम्ही अधिक सुरक्षितपणे एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला थेट मेसेज करु शकत नाही.सध्या हे फिचर फक्त बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पुढे या फिचरची व्यवस्थित चाचणी झाल्यानंतर ते सर्वांना यूज करता येऊ शकते.
दरम्यान ‘फोन नंबर प्रायव्हसी’ फिचरला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी देखील व्हॉट्सअॅपकडून असे वेगवेगळे फिचर आपल्या युजर्ससाठी आणले गेले आहेत. मध्यंतरीच व्हॉट्सअॅपने लॉकचॅट हे फिचर आणले आहे. यामुळे युजर्स आपली चॅट लॉक करुन ठेवू शकतात. तसेच ती हाईट देखील करता येऊ शकते. त्यामुळे कोणीही व्यक्ती तुमची प्रायव्हसी चॅट वाचू शकत नाही.