हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून WhatsApp प्रसिद्ध आहे. व्हाट्सअप वर दररोज वेगवेगळे फीचर्स (WhatsApp Feature) पाहायला मिळत आहेत. आपल्या वापरकर्त्याच्या व्हाट्सअप वापरताना चांगला अनुभव यावा म्हणून कंपनी सतत नवनवीन काहीतरी आणत असते. काही दिवसांपूर्वी मेटाने व्हाट्सअप स्टेटस साठी नवीन फीचर्स आणलं होते. आता व्हाट्सअप मध्ये फोटो एडिटिंग साठी एक नवीन फिचर देण्यात येणार आहेत. हे फिचर AI वर आधारित असेल, ज्यामुळे तुम्ही आरामात तुम्हाला हवा तसा फोटो एडिट करू शकता.
काय फायदा होईल ? WhatsApp Feature
WhatsApp च्या आगामी फीचरमध्ये तुम्ही फोटो एडिटिंग टूलमधील बॅकड्रॉप सारख्या फीचर्ससह तुमचा फोटो चांगल्या प्रकारे एडिट करू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड सुद्धा बदलू शकता. इतकेच नाही तर यूजर्सना फोटोची स्टाईल बदलण्यासाठी रीस्टाईलची सुविधाही मिळणार आहे. तसेच या फिचरच्या माध्यमातून तुम्ही फोटोचा आकार कमी जास्त करू नका.
WhatsApp आणखी एक नवीन फीचर्स (WhatsApp Feature) आपल्या यूजर्स साठी आणण्याच्या तयारीत आहेत. Ask Meta AI असे या फिचरचे नाव असून या फीचर्सच्या माध्यमातून यूजर्स व्हॉट्सअॅपवरुन मेटा एआयला आपले प्रश्न विचारू शकतील. या फीचरची चाचणी सध्या सुरू असून, व्हॉट्सअॅपच्या Android 2.23.25.15 या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. WhatsAppinfo नुसार, तुम्ही Ask Meta AI ला WhatsApp किंवा त्याची वैशिष्ट्ये वापरण्याशी संबंधित कोणताही प्रश्न विचारू शकता यामुळे यूजर्स वेळ वाचणार आहे. तसेच कोणतीही अडचण आल्यास त्यावर आपोआप मार्ग निघेल. WhatsApp ची हि दोन्ही फीचर्स लवकरच युजर्ससाठी रोल आऊट करण्यात येतील.