WhatsApp ने पाठवित आहे एक मेसेज, आत्ताच करा चेक नाहीतर वाढेल आपला त्रास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । व्हॉट्सअ‍ॅपवर आजकाल एक महत्त्वाचा मेसेज किंवा रिमाइंडर पाठवले जात आहे. आपण देखील व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल आणि आतापर्यंत आलेल्या रिमाइंडरकडे आपण लक्ष दिलेले नसेल तर येत्या काही दिवसांत म्हणजेच 15 मे पासून आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकणार नाही. कारण त्याच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी अंतर्गत व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सना नोटिफिकेशन पाठविणे सुरू केले आहे, ज्याअंतर्गत युझर्सनी ते स्वीकारणे बंधनकारक असेल, आणि यानंतरच भविष्यात त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरणे देखील शक्य होईल. येथे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविल्या जाणाऱ्या नोटिफिकेशनचास्क्रीन शॉर्ट घेऊन अनेक लोकांनी साेशल प्लॅटफॉर्मवर अपलोडही केलेले आहेत.

नोटिफिकेशनमध्ये असे लिहून येते आहे
व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नोटिफिकेशन पाठविली जात आहे, त्यामध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की, आपल्या पर्सनल चॅटच्या प्रायव्हसीची प्रायव्हसी बदलणार नाही किंवा युझर्सचे पर्सनल चॅट वाचले देखील जाणार नाहीत, कारण ती एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केलेली आहेत आणि नवीन अपडेट रीलीझ नंतर देखील ती तशीच राहील. तसेच यामध्ये असेही लिहिले जात आहे की, नवीन अपडेटमुळे व्यवसायांना फेसबुक टूल्सचा वापर करून चॅट करणे सोपे होईल, व्यवसायासह चॅट करणे पर्यायी असेल आणि त्यास अ‍ॅपमध्ये लेबल दिले गेले आहे.

आपण ते न स्वीकारल्यास काय होईल?
व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन पॉलिसीबद्दल प्रत्येकजण बराच काळ ऐकत आहे, आता नोटिफिकेशन देखील येऊ लागलेल्या आहेत. आपण व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल ते जाणून घ्या. या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्सना 15 मे पर्यंतचा वेळ दिलेला आहे, ते त्यांच्या वतीने या पॉलिसी बद्दल सर्व गोष्टी साफ करीत आहेत, जेणेकरुन युझर्सच्या मनात कोणताही गोंधळ उडणार नाही. याआधी असेही म्हटले होते की हे पॉलिसी स्वीकारल्यानंतर, आपली खाजगी बाबही खाजगी राहणार नाही. जर आपण मुदतीच्या कालावधीत अटी आणि शर्ती स्वीकारल्या नाहीत तर आपण सुरुवातीला काही दिवस केवळ व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि नोटिफिकेशन पाहण्यास सक्षम असाल, परंतु काही काळानंतर आपण कोणतेही मेसेज वाचूही शकणार नाही आणि पाठवूही शकणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment