WhatsApp Honey Trap Scam : तुम्हांलाही WhatsApp वर ‘या’ व्यक्तीचा मेसेज येतोय? वेळीच सावध व्हा अन्यथा कंगाल व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुमच्या व्हाट्सअप वर कोणत्या तरी अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीचा मेसेज आलाय का? तुम्ही त्यांना इग्नोर केलं तरी ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत का? असं झाल्यास वेळीच सावध व्हा.. कारण हा हनी ट्रॅपचा प्रकार असू शकतो. गेल्या काही दिवसापासुन व्हाट्सअप वर स्कॅमर्स कडून असेल प्रकार सर्रास सुरु आहेत. त्यामुळे WhatsApp Honey Trap Scam नेमका कसा होतो आणि यापासून बचाव करण्यासाठी काय करावं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असं फसवलं जाते जाळ्यात – WhatsApp Honey Trap Scam

सर्वात आधी सदर स्कॅमर्सकडून मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले जाते. खास करून प्रोफाइल फोटोवर सुंदर मुलीचा फोटो लावतात. आणि मेसेज करतात. तुम्ही सुरुवातीला जरी त्यांना इग्नोर केलं तरी ते पुन्हा पुन्हा मेसेज करून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. वापरकर्त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी रोमँटिक बोलतात, गोड़ गोड़ बोलतात… बोलत बोलत मैत्री आणखी घट्ट करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ कॉल सुरू करतात.

व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अशा परिस्थितीत आणलं जाते कि तुम्ही नक्कीच त्यात अडकू शकता. तुमच्या सोबतच्या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाते. हे रेकॉर्डिंग तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना किंवा सोशल मीडियावर उघड करण्याची धमकी दिली जाऊ शकते आणि तुमच्याकडून पैसे उकळले (WhatsApp Honey Trap Scam) जाऊ शकतात.

अशा प्रकारे करा स्वतःचा बचाव –

शक्यतो कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलणं टाळा.
व्हाट्सअप वरून तुमची वयक्तिक माहिती कोणासोबत शेअर करू नका.
जर तुम्हाला अनोळखी नंबर वरून विडिओ कॉल आला तर उचलू नका.. आधी तो नंबर कोणाचा आहे त्याची खात्री करा.
जर तुमच्यासोबत स्कॅम झाला तर याबाबत तक्रार व्हाट्सएपवर करा आणि अधिकाऱ्यांशीही संपर्क साधा.
याशिवाय, अशा ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी भारत सरकारने नुकतेच Chakshu नावाचे नवीन वेब पोर्टल सुरू केले आहे त्यावरूनही तुम्ही तक्रार दाखल करू शकता.