आता एकाच वेळी चार डिव्हाईसवर वापरता येणार WhatsApp; जाणून घ्या फायदे आणि तोटे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल व्हॉट्सअ‍ॅप हे स्मार्टफोन युजरच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनले आहे. आजकाल दररोजच्या कामापासून ते ऑफिसपर्यंतची अनेक काम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत असतात. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरची जोरदार चर्चा सुरु आहे. या फीचरमुळे एकाच वेळी चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. यामुळे युजर्स एकत्र पाच डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकणार आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पाचही डिव्हाईसवर प्रत्येकवेळी लॉगइन करण्याची गरज भासणार नाही.

मल्टि डिवाइस सपोर्ट
व्हॉट्सअ‍ॅप सध्या या नव्या फीचरवर काम करत आहे. युजर या नव्या फीचरद्वारे एकत्र चार डिव्हाईसवर काम करू शकणार आहेत. म्हणजेच एकाचवेळी पाच मोबाईल किंवा डेस्कटॉपवर काम केले जाऊ शकते. कंपनी व्हॉट्सअ‍ॅपच्या मल्टि डिवाइस सपोर्ट फीचरला लवकरच लाँच करू शकते. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, या फीचरचे बीटा वर्जन सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी लाँच करण्यात येणार आहे. यानंतर हे फिचर स्मार्टफोनसाठी देण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप मल्टि डिवाइस सपोर्ट फीचर वेगवेगळ्या डिव्हाईसवर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी युजर ज्या मोबाईल नंबरवरुन अकाउंट बनवत आहेत त्या नंबरवर OTP जाऊ शकतो. OTP वेरिफाय झाल्यानंतर अधिकाधिक चार अ‍ॅडिशनल डिव्हाईसमध्ये एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट युजरला वापरता येणार आहे.

सुरुवातीला येईल ही समस्या
व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर वापरणारे युजर, अशा युजर्सला मेसेज करू शकणार नाहीत, जे आपल्या फोनमध्ये आउटडेटेड व्हॉट्सअ‍ॅप वर्जन वापरतात. या फीचरमुळे सुरुवातीला परफॉर्मेन्स आणि क्वॉलिटीबाबत काही समस्या येऊ शकतात.परंतु काही काळानंतर त्या सोडवल्या जातील. सध्या बीटा टेस्टरला या फीचरचा वापर करण्यासाठी इन्वाईट करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रोजेक्टवर काम करत आहे. डिव्हाईस जोडण्यासाठी एक नवीन सिस्टमदेखील तयार करण्यात येत आहे. हे फीचर लाँच झाल्यानंतर युजर मेन डिव्हाईसमधून दुसऱ्या सर्व डिव्हाईसला कंट्रोल करू शकणार आहे. तसेच तुम्ही कोणतेही डिव्हाईस लिंक किंवा अनलिंक करू शकता.

Leave a Comment