Whatsapp New Feature | व्हाट्सअप हे नेहमीच नवनवीन पिक्चर लॉन्च करत असते. त्यामुळे नागरिकांना देखील त्याचा फायदा होत असतो. जगातील बहुसंख्य लोक हे व्हाट्सअपचा वापर करत असतात. त्यामुळे मेटा देखील त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन अपडेट्स देत असतात. जेणेकरून त्यांना व्हाट्सअपचा वापर अत्यंत सुलभ गतीने करता येईल. अशातच आता मेटा व्हेरिफाइड फीचर व्हाट्सअप करण्यात आलेले आहे. म्हणजेच आता whatsapp वर देखील बिजनेस अकाउंट्स ब्लू टिक सर्विसचा लाभ घेऊ शकणार आहेत. आता या मदतीने युजर आता बिझनेस अकाउंटला व्हेरिफाइड करू शकतील.
मेटाने हे फीचर (Whatsapp New Feature) मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केले होते. या फिचरच्या मदतीने कोणीही त्यांचे इंडिव्हिज्युअल किंवा बिजनेस अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे वापरू शकतात. ही सुविधा भारतात नुकतीच लॉन्च करण्यात आलेली आहे. मेटाच्या या फीचरची माहिती खुद्द मार्क झुकेरबर्ग यांनी दिलेली आहे. त्यांनी आपल्या व्हाट्सअपवर ही माहिती शेअर केलेली आहे.
या फिचरचा फायदा काय ? | Whatsapp New Feature
मेटा व्हेरिफाइड (Whatsapp New Feature) ही एक प्रकारची प्रोसेस आहे. ज्यात कंपन्या अकाउंटचे सगळे डिटेल्स ठेवत असते आणि तपासत असते. त्या अकाउंटच्या अथेरिटीचा शोध घेतला जाऊ शकतो. जेव्हा कोणत्याही अकाउंट सर्व निकष पास करते. तेव्हा मेटा त्याला ब्लू टिक सर्विस पुरवते. परंतु यासाठी अकाउंट होल्डरला मंथली सबस्क्रीप्शन फी द्यावी लागेल.
मेटा व्हेरिफाइड फीचर आता बिझनेस अकाउंटला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लहान बिझनेसला यातून मोठी मदत होणार आहे. याच्यामध्ये आपली ऑथेंटीसिटी मिळू शकतील तसेच आत्तापर्यंत व्हाट्सअपचा मेटा व्हेरिफाइड प्रोग्रॅमचा हजारो लोकांना लाभ घेतला आहे आणि याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.