हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातही व्हाट्सअप हे एक इन्स्टंट सोशल मीडिया ॲप आहे. प्रत्येक जण व्हाट्सअप वापरत असतो. जगभरात मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जाते. परंतु आजकाल अनेक वेळा व्हाट्सअप हॅक होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जर तुमचे देखील व्हाट्सअप दुसरीकडे कुठे चालू असेल, तर तुम्हाला अगदी पटकन एका फीचर्सच्या माध्यमातून करणार आहे.
लिंक डिवाइस या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हाट्सअप कुठे कुठे चालू आहे. हे शोधू शकता. अनेक वेळा आपण व्हाट्सअप लॉगिन करतो. पण लॉग आऊट करण्याचे विसरतो. आणि व्हाट्सअप तसेच राहते. परंतु अशावेळी व्हाट्सअप कुठे कुठे चालू आहे. ते पाहू शकता आणि ते बंद देखील करू शकता. यासाठी तुम्ही सगळ्यात आधी whatsapp चालू करा. नंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा आणि थ्री डॉटवर टॅप केल्यानंतर तुम्हाला लिंक केलेल्या डिवाइस ऑप्शन वर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुमचे व्हाट्सअप कुठे कुठे चालू आहे याची तुम्हाला संपूर्ण यादी दिसेल.
या यादीमध्ये जर तुमचे व्हाट्सअप कुठे लॉगिन असेल तर तुम्ही त्या व्हाट्सअपच्या नावाखाली टॅप करून अकाउंट लॉग आऊट देखील करू शकता. whatsapp चे हे फीचर खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुमचे व्हाट्सअप चुकूनही दुसऱ्या डिवाइस वर लॉगिन झाले असेल, तर तुम्ही तुमच्या प्रायमरी डिवाइसच्या मदतीने ते अकाउंट सहजपणे हटवू शकता. तसेच तिथून तुम्ही लॉग आऊट देखील करू शकता.