हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता WhatsApp लवकरच युजर्सना काही खास सेवा प्रदान करणार आहे. ज्यामुळे वापरकर्ते त्यांची कामे वेळेत आणि वेगाने करू शकतील. WhatsApp च्या या नव्या फीचर्समुळे तुम्हाला वीज, पाणी, फोन रिचार्ज, भाडं आणि इतर सर्व बिले सहजपणे भरता येणार आहेत. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे आणि लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. चला या फीचरबदल सविस्तर माहिती पाहुयात.
WhatsApp चे नवीन फीचर –
व्हाट्सअँपच्या या नव्या फीचर्समुळे लाईटबिल, पाणी बिल, फोन रिचार्ज आणि भाडं ऑनलाईन भरू शकता . हे सर्व करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या अॅप्सवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही . हे फीचर UPI पेमेंट सिस्टीमसोबत एकत्रित होणार आहे. त्यामुळे, WhatsApp पेमेंटचा वापर करून तुम्ही इन्स्टंट बिल पेमेंट्स आणि रिचार्ज करणे सोपे होणार आहे. यासाठी WhatsApp ने आपल्या UPI-आधारित पेमेंट सिस्टीम “WhatsApp Pay” मध्ये सुधारणांवर काम सुरू ठेवले आहे. यापूर्वी केवळ 10 कोटी युजर्ससाठी उपलब्ध असलेली सुविधा आता जास्त लोकांसाठी खुली करण्यात आली आहे.
डिजिटल पेमेंट्ससाठी असलेली स्पर्धेची स्थिती –
भारतामध्ये डिजिटल पेमेंट्ससाठी असलेल्या स्पर्धेची स्थिती पाहता, फोनपे आणि गुगल पे दोन्ही आघाडीवर आहेत. फोनपे 48 टक्के मार्केट शेअरसह टॉप पोजिशनवर आहे, तर गुगल पे 37 टक्के मार्केट शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत, WhatsApp च्या या नव्या फीचरमुळे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धा होईल. आता लवकरच तुम्हाला तुमच्या रोजच्या व्यवहारांसाठी WhatsApp वर आणखी सोयीस्कर सेवा मिळतील, ज्यामुळे तुमचं जीवन आणखीन सोपं होण्यास मदत मिळेल.