Whatsapp Privacy Policy | सुरक्षेच्या नावाखाली माहिती गोळा करणाऱ्या नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’ नक्की आहेत तरी काय?

Whatsapp Privacy Policy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोणत्याही स्वतंत्र माणसाला आपल्यावर कोणी पाळत ठेवलेले आवडणार नाही. मग ती प्रत्यक्ष पाळत असो वा अप्रत्यक्ष! अशाच प्रकारची अप्रत्यक्ष पाळत ऑनलाईन माध्यमातून आपल्या मोबाईल मधील काही ॲप्स आपल्यावरती ठेवत असतात. त्यापैकी सध्या चर्चेत असलेले अँप म्हणजे व्हाट्सअप. व्हाट्सअपने नुकतेच आपल्या ‘Whatsapp Privacy Policy’ मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’मध्ये नेमके काय बदल केले गेले आहेत आणि याचा वैयक्तिक वापरकर्त्यावर काय परिणाम होईल हे आपण या ‘अपडेट’मध्ये पाहणार आहोत.

2009 साली व्हाट्सअपची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर चार वर्षातच व्हाट्सअपचे जवळपास चाळीस कोटीच्या आसपास वापरकर्ते झाले. आज हीच संख्या अब्जावधी च्या घरात आहे. वापरण्यास सोपे आणि मोफत सेवा असल्यामुळे लवकरच Whatsapp जागतिक वापरकर्त्यांच्या पसंतीचे अँप बनले. आज हेच अँप नवीन बदललेल्या Whatsapp Privacy Policy नुसार एक प्रकारचे जासूस असल्यासारखे काम करणार आहे.

नवीन नियम :
व्हाट्सअप आपल्या जुन्या नियमानुसार व्हाट्सअप स्टेटस, ग्रुपचे नाव, ग्रुपचे आयकॉन आणि किती सारखे सारखे व्हाट्सअप वापरले जाते याची संपूर्ण माहिती व्हाट्सअप पूर्वीप्रमाणेच घेत राहील आणि त्यासोबतच व्हाट्सअप नवीन नियमानुसार नवीन पेमेंट फीचरच्या केलेल्या पेमेंट विषयी संपूर्ण माहिती सोबतच फोन लोकेशन, फोन विषयी संपूर्ण माहिती जसे मॉडेल नंबर, फोन ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राउझिंगमध्ये काय सर्च करतो याची सर्व माहिती व्हाट्सअप त्याची मालकी मुख्य कंपनी फेसबुक आणि फेसबुकच्या मालकीच्या ॲप सोबत शेअर केले जाईल. सध्या व्हाट्सअपने या सर्व बाबी या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केल्या असल्याचे निर्वाळा दिला आहे.
हे सर्व नियम एका महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच आठ फेब्रुवारी पासून लागू होतील. Whatsapp Privacy Policy ८ तारखेनंतर या नियमांना पर्याय उपलब्ध नसेल. जर वापरकर्त्याला ते नियम मान्य असतील तरच व्हाट्सअप वापराची परवानगी वापरकर्त्याला मिळेल अन्यथा नाही.

संभाव्य धोका :
नवीन ‘Whatsapp Privacy Policy’ मार्फत मिळवलेल्या माहितीचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो यामध्ये फेसबुक आणि त्याच्या मालकीच्या ॲप्सच्या फायद्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या इच्छा आणि विचारसरणीनुसार त्याला टार्गेट केले जाऊ शकते अशी शक्यता काही सायबर एक्सपर्ट यांनी व्यक्त केली.