आता WhatsApp वरून पाठवता येणार थेट Telegram वर मेसेज; लवकरच येतंय नवं फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया WhatsApp चे जगभरात करोडो वापरकर्ते आहेत. वापरायला अतिशय सोप्प असलेले व्हाट्सअप लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वच जण अगदी सहजरित्या वापरत आहेत. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत वेगवेगळे फीचर्स आणत असते. त्यामुळे यूजर्सना सुद्धा एक वेगळा अनुभव व्हाट्सअप वापरताना येत असतो. आताही WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सॲप वापरून तुम्ही टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या ॲप्सवर संदेश पाठवू शकाल.

WABetaInfo या व्हॉट्सॲपच्या नवीन वैशिष्ट्यांचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या काळात WhatsApp 2.24.6.2 व्हर्जनचे एक नवीन अपडेट आणणार आहे. या अपडेटमध्ये WhatsApp वरून थेट Telegram वर मेसेज करण्याची परवाग्नी यूजर्सना मिळेल. सध्या तरी या अपडेटच टेस्टिंग सुरु असून एकदा का हे टेस्टिंग पूर्ण झाले कि कंपनी हे फीचर्स यूजर्स साठी रोल आऊट करेल. विशेष गोष्ट म्हणजे हा पर्याय क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंगमध्ये रस नसलेल्या यूजर्सना पूर्णपणे निवड रद्द करण्याची परवानगी देतो. म्हणजेच ज्यांना व्हाटसअप वरून टेलिग्राम वर मेसेज पाठवायचा नाही त्यांनी हे फीचर्स वापरलं नाही तरी चालेल.

प्रोफाइल फोटो आणि नाव दिसणार नाही

तुम्ही WhatsApp वरून टेलिग्राम किंवा सिग्नल अँप वर कोणाची चॅटिंग कराल तेव्हा तुमच्या मोबाईलची स्क्रिन वेगळी दिसेल. मात्र तुमचं नाव आणि प्रोफाइल फोटो दिसणार नाही. कारण व्हॉट्सॲप इतर ॲप्सची माहिती ठेवू शकत नाही. त्यामुळे, व्हॉट्सॲप त्या चॅटिंग ॲपचे नाव दाखवेल ज्यावरून तुमचं चॅटिंग सुरू आहे. आणि डीफॉल्ट प्रोफाइल फोटो देखील जोडेल.