व्हाट्सएप वर येणाऱ्या या नवीन फीचर्स बद्दल तुम्हाला माहिती आहे काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Techमित्र | व्हाट्सएप आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फिचर उपलब्ध करत असते. व्हाट्सएप ने यावर्षी आपल्या प्लॅटफॉर्म वर अनेक नवीन फिचर आणले आहेत. अकाउंट इंफो रिक्वेस्ट, व्हाट्सएप पेमेंट, स्वाइप टू रिप्लाई, स्टिकर असे एकसे बढकर एक खास फीचर्स व्हाट्सएप ग्राहक्कांना उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या व्यतिरिक्त आणखीन काही विशेष फीचर्स लौंच करण्यासाठी  व्हाट्सएप प्रयत्न करत असल्याचे समजत आहे. WaBetaInfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सएप खालील फीचर्स लौंच करणार आहे. तर जाणून घेऊन लौंच होणार्या य आगामी फीचर्स बद्दल…

1) मल्टी शेयर फीचर – जेव्हा व्हाट्सएप या फिचर ला लाइव्ह करेल तेव्हा आपण कुठल्याही मेसेज ला फॉरवर्ड करण्याअगोदर त्याचा प्रिव्हू पाहू शकाल.

2) कन्सेक्युटिव वॉइस मैसेज प्लेबैक – या फिचर मुळे वापरकर्त्यांला सतत येणारे वॉइस मैसेज ऑटोमेटिक सुरू होतील. कन्सेक्युटिव वॉइस मैसेज फीचर नुसार व्हाट्सएप एकासोबत पाठवलेले दोन पेक्षा जास्त वॉइस मेसेज ला ऑटोमेटिक सुरू करील .परंतु या फिचर ला काम करण्यासाठी वापरकर्त्यांला कमीत कमी एक वॉइस मेसेज स्वतः सुरू करावा लागेल. प्रत्येक वॉइस मेसेज संपल्यानंतर व्हाट्सएप एक छोटीशी टोन वाजवेल.त्यानंतर ऑटोमेटिक दुसरा वॉइस मेसेज सुरू होईल.

3) ग्रुप कॉल शॉर्टकट – या फिचर च्या मदतीने आपण कुठल्याही ग्रुप ला ग्रुप कॉल करू शकतो.आता ग्रुप कॉल करण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीला कॉल करून दुसऱ्या व्यक्तीला जोडावा लागतो .परंतु हे फिचर आल्यानंतर वापरकर्ता ग्रुप मधील 3 लोकांना सिलेक्ट करून त्यांना विडियो कॉल करू शकेल.

4) नाइट थीम व डार्क मोड – व्हाट्सएप वर या फिचर चा वापरकर्ते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.नाइट थीम म्हणा किंवा ब्लैक मोड व्हाट्सएप वर या फिचर चा वापरकर्ते अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.यूट्यूब आणि ट्विटर वर हे फिचर गेलेल आहे .लवकरच या फिचर चे आगमन व्हाट्सएप वर होऊ शकते.

5) स्टिकर सर्च – व्हाट्सएप ने सध्या स्टिकर च फिचर आणलं.हे फिचर लोकांना खूप आवडलं .आता व्हाट्सएप स्टिकर सर्च आणत आहे.ज्याच्या मदतीने आपल्याला हवं ते स्टिकर सर्च करून मिळवता येईल.
याच्या व्यतिरिक्त व्हाट्सएप अनेक फिचर वर काम करत आहे.या सगळ्यांची माहिती व्हाट्सएप वर नजर ठेवणारी WabetaInfo ने दिली.

(Techमित्र – स्वप्नील हिंगे )

Leave a Comment