WhatsApp UPI QR Code Feature : WhatsApp वरून पेमेंट करणं झालं सोप्प; लाँच झालं नवं फीचर्स

WhatsApp UPI QR Code Feature
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो चाहते आहेत. आपल्या यूजर्सना अजून चांगला अनुभव यावा आणि व्हाट्सअप वापरणं सोप्प जावं यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आताही व्हाट्सअप वर असं एक फीचर्स आणण्यात आलं आहे, ज्यामुळे एकेमकांना ऑनलाईन पेमेंट करणं सोप्प झालं आहे. WhatsApp UPI QR Code Feature असे या फीचर्सचे नाव असून आता तुम्ही चॅट लिस्टमधूनच QR कोड स्कॅन करू शकता.

सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेन्टचे प्रमाण वाढलं आहे. कमी वेळेत एकमेकांना पैसे पाठवणं शक्य होत असल्याने आता खिशात पैसे घेऊन कोणी फिरत नाही. ऑनलाइन आणि डिजिटल पेमेंटचा वाढता ट्रेंड पाहून व्हॉट्सॲपने अनेक वर्षांपूर्वी व्हॉट्सॲप पे सुरू केले होते, पण आता कंपनीने चॅट लिस्टमधूनच QR कोड स्कॅन करून UPI ​​पेमेंट करण्याचा पर्यायही सुरू केला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपवर UPI QR कोडसाठी जास्त सर्च करण्याची गरज भासणार नाही. सध्या हे फीचर्स काही निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये कंपनी जगभरातील सामान्य वापरकर्त्यांसाठी हे नवीन फीचर्स आणण्यास सुरुवात करेल.

वरच्या बारमध्ये QR कोडचा पर्याय दिसणार – WhatsApp UPI QR Code Feature

सध्या WhatsApp वरून पेमेंट करायचं झाल्यास, अनेक स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. परंतु आता WhatsApp UPI QR Code Feature मुळे ॲप ओपन केल्यानंतर, सर्च आयकॉन आणि कॅमेरासह वरच्या बारमध्ये QR कोडचा पर्याय दिसू लागेल. यूजर्स कोणताही QR कोड स्कॅन करून अगदी आरामात पेमेंट करू शकतील आणि चॅटिंग सुद्धा सुरु ठेवू शकतील. व्हाट्सअपच्या या नव्या फीचरनंतर युजर्सना पेमेंट करणे सोपे होणार आहे.