हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांना सहज मेसेज करू शकतो, फोटो आणि विडिओ तसेच आपले काही डॉक्युमेंट शेअर करू शकतो. वापरायला अतिशय सुलभ आणि सोप्प असल्याने व्हाटसअपचे जगभरात अनेक यूजर्स आहेत. मात्र आजकाल याच व्हाट्सअपवरून लोकांना फसवण्याचा काम सतत सुरु असते. असाच एक मेसेज मागील काही दिवसांपासून व्हाट्सअपवर वाऱ्यासारखा पसरत आहे ज्यामध्ये म्हंटल आहे कि, भारत सरकारने कोल्ड ड्रिंक्स (Cold Drink) टाळण्यास सांगण्यात आले आहे. कारण त्यामध्ये इबोला विषाणू असतो. परंतु पीआयबी फॅक्ट चेकने हा फेक मेसेज असल्याचे म्हंटल आहे. त्यामुळे व्हाट्सअप वापरकर्त्यानी या मेसेजवर विश्वास ठेऊ नये.
PIB फॅक्ट चेक (PIB Fact Check) नेहमीच सोशल मीडियावरील खरे- खोट्या दाव्याबाबत माहिती समोर आणून नागरिकांना सतर्क करत असते. नुकतंच PIB फॅक्ट चेक युनिटने त्याच्या अधिकृत X खात्यावर एक पोस्ट केली आहे.ज्यामध्ये म्हंटल आहे कि, हा व्हॉट्सॲप मेसेज बनावट आहे, त्यामुळे या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. PIB ने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे कि, तुम्हालाही असा मेसेज (WhatsApp Fake Message) आला आहे कि, ज्यामध्ये लिहण्यात आलंय भारत सरकारने नागरिकांना थंड पेये टाळण्याचा सल्ला दिला आहे कारण ते इबोला व्हायरसने दूषित आहेत. जर असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा, कारण हा मेसेज फेक आहे त्यात कोणतेही तथ्य नाही असं PIB ने स्पष्ट केलं आहे.
फेक व्हॉट्सॲप मेसेजपासून कसा बचाव कराल?
जेव्हा तुम्हाला कोणताही संशयास्पद व्हाट्सअप मेसेज आला तर हा मेसेज नेमका कुठून आला याची खात्री करा
यासाठी सदर मेसेज होल्डरचे प्रोफाइल चेक करा, त्याचा मोबाईल क्रमांक आणि अन्य डिटेल्स चेक करा
कोणत्याही संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका, कारण या लिंक्स म्हणजे स्कॅमर्सकडून तुम्हाला अडकवण्याचे जाळे असू शकते.
कोणाचीही तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती विचारली तर लगेच शेअर करू नका. ओटीपी क्रमांक, बँक खाते नंबर
जर तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर त्याची तक्रार व्हाट्सएप किंवा संबंधित अधिकाऱ्यांना करा.
शक्यतो नेहमी WhatsApp अपडेट करत जा.