Sunday, February 5, 2023

महिलांवर शेरेबाजी का करताय हा जाब विचारल्यामूळे एकास आठ जणांनी केली मारहाण

- Advertisement -

औरंगाबाद | तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारल्या प्रकरणी एका प्रवाशाला सात ते आठ हॅकर्सकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी परतुर रेल्वे स्टेशनवर घडला आहे. याप्रकरणी औरंगाबादचा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारण्याचा जाब विचारणाऱ्या एका प्रवाशाला 7 ते 8 हाॅकर्सकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी परतूर रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तपोवन एक्सप्रेस मध्ये काही हॉकर्स महिलांना पाहून अपशब्द वापरत आणि शेरेबाजी करत होते. या एक्सप्रेस मध्ये प्रवास करत असलेले संजय वाघमारे यांनी त्यांना असे कृत्य करण्यास मनाई केली असता आमचे गाव येत आहे. तुला बघून घेतो असे म्हणाले. यानंतर परतूर स्टेशन आल्यावर सात ते आठ हॉकर्सने संजय वाघमारे यांना मारहाण केली. आणि रेल्वे सुरू झाल्यावर पळून गेले. त्याठिकाणी असलेल्या काही लोकांनी हा व्हिडीओ मोबाईल मध्ये चित्रीत केला. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

याप्रकरणी संजय वाघमारे यांनी नांदेड येथे फिर्याद नोंदवली असून पोलीस हवलदार गडलिंगे यांनी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरवले हे करीत आहे. यात एका हाॅकर्सची ओळख पटली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.