व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिंदे गटाकडून बंडाची सुरुवात कधीपासून?? आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ऑपरेशन झालं असतानाच शिंदे गटाकडून बंड करण्याची तयारी सुरू होती असा दावा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवसंवाद यात्रा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेळाव्यात त्यांनी शिंदे गटावर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, हे बंड नव्हे तर गद्दारी आहे. ही फक्त राजकीय गद्दारी नसून माणूसकीशी गद्दारी आहे. कारण जेव्हा उद्धव ठाकरेंवर एकाच वेळी 2 शस्त्रक्रिया पार पडल्या आणि त्यांना 2 महिने बेडवरून हलता पण येत नव्हते तेव्हाच मला मुख्यमंत्रीपद मिळेल का?? माझ्यासोबत किती आमदार येतील या सर्व गोष्टी सुरू होत्या असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला.

हा उठाव नसून गद्दारीच आहे, जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तुमच्यात जर हिंमत असती तर अस गुवाहाटी ला पळाला नसता.. आता थोडी तरी जर लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभं रहा अस आव्हानही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले.