एलपीजी सिलिंडर देताना डिलिव्हरी बॉयने अतिरिक्त शुल्क मागितल्यास काय करावे याबाबत कंपनीने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) चे एलपीजी सिलेंडर ग्राहक असाल तर आपण ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. एलपीजी सिलेंडरच्या पेमेंटसंदर्भात एचपीसीएलने विशेष माहिती दिली आहे. आता तुम्हाला एलपीजी सिलेंडरच्या वेळी डिलिव्हरी बॉयला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

आपण एलपीजी सिलेंडर डिलीव्हरी चार्ज का देऊ नये?
काही माध्यमांच्या रिपोर्टमध्ये माहितीच्या अधिकाराचा हवाला देत एकाने म्हटले की, कंपनीने स्पष्टपणे म्हटले आहे की, ग्राहकांना गॅस डिलीव्हरी करणाऱ्यास डिलीव्हरी चार्ज देण्याची गरज नाही. आरटीआयद्वारे अर्ज केल्यानंतर एचपीसीएलने याबाबत माहिती दिली आहे.

https://t.co/wqE1O4IF3v?amp=1

एचपीसीएलने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, गॅस डिस्ट्रिब्यूटरची जबाबदारी ग्राहकांच्या दारात गॅस सिलेंडर डिलीव्हर करण्याची आहे. कोणत्याही इमारतीच्या किंवा फ्लॅटच्या कोणत्याही मजल्यावरील गॅस डिलिव्हरीसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. ग्राहकाला बिलात दिलेली रक्कमच द्यावी लागेल.

https://t.co/jOiVSDb2wh?amp=1

हैदराबादच्या करीन अन्सारी यांनी एचपीसीएलला आरटीआयद्वारे हा प्रश्न एक विचारला. जेव्हा त्यांना डिलिव्हरी बॉयकडून जास्तीचे पैसे मागितले गेले तेव्हा त्याने आरटीआयद्वारे ही माहिती मागविली.

https://t.co/P9QwJOIJGZ?amp=1

एचपीसीएलने याबाबत म्हटले आहे की, ग्राहक हा अतिरिक्त शुल्क देण्यास नकार देऊ शकतात. गॅस वितरक एलपीजी डिस्ट्रिब्यूटर देताना ग्राहकांकडून डिलिव्हरी शुल्क वसूल करतात, असा कोणताही नियम नाही. बिलात दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे घेता येणार नाहीत.

https://t.co/iLOLMKNRyL?amp=1

आपल्याला सिलेंडरची डिलिव्हरी कॉस्ट मागितल्यास काय करावे?
आरटीआयद्वारे विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कंपनीने असे सुचवले आहे की, ग्राहक डिलीव्हरी करणार्‍या व्यक्ती किंवा गॅस डिस्ट्रिब्यूटर विरूद्ध तक्रार देऊ शकतात.

https://t.co/eYNM2a75t2?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment