औरंगाबाद – वक्रतुंड महाकाय… गणेश जी भारतावरील नव्हे तर संपूर्ण जगावरील अच्को रवणाचे विघ्न दूर करोत असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सर्व धर्मीयांचे सण-उत्सव सर्वधर्मीय आणि एकत्र आनंदात साजरे करण्याची औरंगाबादची परंपरा कायम ठेवावी असे आवाहनही यावेळी जलील यांनी केले. गणेशोत्सव शांतता समितीची बैठक काल सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर येथे झाली यावेळी खासदार जलील याठिकाणी बोलत होते.
तापडिया नाट्यमंदिर आतील बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कोरोना पाकिस्तानात जावो असे म्हटले. त्याला उत्तर देताना खासदार जलील म्हणाले की, वक्रतुंड महाकाय गणेश जी इतर सर्व दुःखांचे निवारण करणारे देवता आहेत. त्यामुळे त्यांनी जगभरातील कोरोनाचे संकट दूर करो नूतन कॉलनी येथे गणेशोत्सव विषयीचे होर्डिंग लावले आहे, त्यात साठ जणांचे फोटो आहेत. परंतु माझा फोटो नाही. गेल्या सात वर्षात गणेशोत्सव समितीत माझे नाव का नाही ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. विविध सण, उत्सवांवर छोटे व्यापारी, विक्रेत्यांचे पोट अवलंबून असते, त्यामुळे त्यांना कोरोनाच्या नावाखाली दडपून ठेवू नये. नियमावली पाहून सर्व व्यवहार खुले करून द्या, असे आवाहन त्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांना केले.
नियमांचे पालन करण्यामध्ये जनतेचे सहकार्य आवश्यक आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यावेळी म्हणाले. या बैठकीला महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नूतन अध्यक्ष अभिषेक, देशमुख माजी महापौर नंदकुमार घोडेले, बापू घडामोडे, रशीद मामू, यांच्यासह राजेंद्र दाते पाटील, गजानन बारवाल, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, मीना मकवाना, सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी आभार मानले.