जेव्हा अंडरवर्ल्ड डॉन आजोबा होतो..! नातीला खेळवताना दिसले डॅडी उर्फ अरुण गवळी; फोटो झाला वायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अक्षय वाघमारे अलीकडेच एका चिमुकलीचा बाबा झाला आहे. त्याची पत्नी योगिता गवळी हिने एका गोड चिमुकल्या परीला जन्म दिला आणि वाघमारेंच्या घरी आनंदी आनंद झाला. मात्र हा आनंद केवळ वाघमारे कुटुंबासाठी मर्यादित नसून हा आनंद गवळी कुटुंबाचीही आहे. कारण योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन डॅडी उर्फ अरुण गवळीची मुलगी आहे. कधीकाळी सर्वत्र दहशत असणारा अंडरवर्ल्ड डॉन आता आजोबा झाला आहे. त्यात आजोबा आणि नातीची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीमुळे अरुण गवळीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दरम्यानचा एक फोटो अभिनेता अक्षय वाघमारेने हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

अक्षयने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आजोबा आणि नातीच्या भेटीचा हा क्षण टिपून आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. या फोटोने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. या फोटोत आपल्याला अरुण गवळी त्यांच्या नातीला मांडीवर घेऊन बसलेले दिसतात. इतकेच नव्हे तर तिच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत हसत असल्याचे हे दृश्य आहे. आपल्या नातीला भेटण्याचा आणि तिच्या पहिल्या स्पर्शाचा एक वेगळाच आनंद आजोबा म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. या फोटोत त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आशा गवळी देखील दिसत आहेत. तर अक्षयचे आईबाबा देखील दिसत आहेत.

‘जेव्हा रहस्य गुंतलेली असतात तेव्हाच आकर्षणे तीव्र असतात’, असे अनोखे कॅप्शन अक्षयने हा फोटो शेअर केला आहे. अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गतवर्षी ८ मे रोजी कोरोनाचे नियम पळून मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्नगाठ बांधली होती. लग्नाला १ वर्ष होताच या दोघांनी आपल्या कुटुंबासमवेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाल्याने सर्वानाच फार आनंद झाला आहे. दरम्यान, बाबा झाल्यावर अक्षयने आपला आनंद आणि भावना आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या होत्या. या बाबत बोलताना तो म्हणाला होता कि, ‘मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

You might also like