राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Air चे विमान कधी टेक ऑफ करणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राकेश झुनझुनवाला समर्थित विमान कंपनी अकासा एअरची सर्व्हिस जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सुरू करण्यासाठी, Akasa Air नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून सर्व आवश्यक लायसन्स मिळविण्यासाठी वेगाने काम करत आहे.

हैदराबादमध्ये झालेल्या एअर शोमध्ये Akasa Air चे मुख्य कार्यकारी विनय दुबे यांनी ही माहिती दिली. मात्र, कंपनी कोणत्या शहरांसाठी सुरुवातीला फ्लाईट्स सुरु करणार हे दुबे यांनी सांगितले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच Akasa Air ने 72 बोइंग 737 MAX जेट विमानांची ऑर्डर दिली होती.

NOC मिळाली
कंपनी लॉन्च झाल्यानंतर 12 महिन्यांत 18 विमाने समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, Akasa Air येत्या 5 वर्षात आपल्या ताफ्यात 72 विमानांची भर घालणार आहे. कंपनीला येत्या काही महिन्यांत विमानाच्या पहिल्या बॅचची डिलिव्हरी मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, Akasa ची मूळ कंपनी SNV Aviation Private Limited ला सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले. NOC मिळाल्यानंतर एअर ऑपरेटर्स परमिट (AOP) मिळविण्यासाठी एअरलाइनला सहसा सहा महिने लागतात.

जेट एअरवेज देखील लवकरच पुन्हा उड्डाण करेल
जेट एअरवेजची विमाने लवकरच आकाशात उडताना दिसणार आहेत. एअरलाइनचे नवीन प्रमोटर जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम एअरलाइनला पुनरुज्जीवित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. जेट एअरवेजचे नवीन प्रमोटर नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या सहकार्याने या एअरलाइनला पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

जेट एअरवेज एप्रिल 2019 मध्ये कर्जामुळे बंद झाली होती. प्रचंड कर्जामुळे 17 एप्रिल 2019 रोजी एअरलाइन बंद झाली. जेव्हा कंपनी बंद पडली तेव्हा तिच्याकडे फक्त 16 विमाने उरली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, जालान-कॅलरॉक रिझोल्यूशन कन्सोर्टियमने सांगितले होते की, एअरलाइन 2022 च्या तिसऱ्या-चौथ्या तिमाहीपासून लहान आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स सुरू करेल. जेट एअरवेजचे नवे प्रमोटर जालान हे दुबईस्थित भारतीय-अमेरिकन व्यापारी आहेत, तर CalRock कॅपिटल मॅनेजमेंट लिमिटेड ही लंडनस्थित आर्थिक सल्लागार आणि पर्यायी मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारी जागतिक कंपनी आहे.