हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजवर एलियन्सच्या राहण्याविषयी अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. अनेक जण असे म्हणतात की एलियन्स एका वेगळ्या ग्रहावर राहतात. तर काहीजण एलियन्स पृथ्वीवरच राहत असल्याचा दावा करतात. मात्र या सगळ्या दाव्यांमध्ये Nasa च्या माजी रिसर्चरने सर्वांना अचंबित करणारा एक वेगळाच दावा केला आहे. त्यांनी केलेल्या या दाब्यामुळे एलियनच्या राहण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नासाच्या रिसर्चने असा दावा केला आहे की, यूएफओचे पालयट आपल्या महासागरांच्या खाली असू शकतात. अशी अनेक कारणे आहेत, ज्यात एलियन्स पृथ्वीच्या तळावर राहण्याऐवजी पाण्याखाली राहून आपल्यावर नजर ठेवत असतील. जर त्यांना लपून राहायचे असेल तर त्यांच्यासाठी समुद्र हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. ते हमखास तिथे बेस बनवून राहत असतील.
तसेच, “खरे तर पृथ्वीचा 75 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे आणि त्या सर्व भागापर्यंत आपल्याला पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे एलियनसाठी ही जागा सर्वात सेफ आहे. तसेच ते हमखास कोणत्या ना कोणत्या समुद्राच्या तळाशी राहत असणार” असे देखील नासाच्या रिसर्चने म्हणले आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना, “एलियन्सला पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहिल्यावर अनेक समस्या होऊ शकता. परंतु ते जर समुद्रात राहिले तर त्यांना एखाद्या दुसऱ्या ग्रहावर जाणे सहज सोपे आहे. ओशियनचं तापमान 32 डिग्री फॅरेनहाट आणि 212 डिग्री फॅरेनहाट असतं. त्यामुळे समुद्रापासून ओशियनपर्यंत एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर गेल्यावरच्या तापमानात मोठा बदल होतो” अशी माहिती रिसर्चने दिली आहे.