धनत्रयोदशीला कुठे गुंतवणूक करावी? ‘हे’ 4 सर्वोत्तम पर्याय आहेत जिथे तुम्ही पैसेही गुंतवू शकता; त्याविषयीची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत हा जगातील दुसरा असा देश आहे जिथे सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो. सोने हा केवळ मौल्यवान धातूच नसून भारतीय लोकांसाठी तो एक शुभ धातू देखील आहे. भारतीय विशेषतः धनत्रयोदशी आणि दिवाळी निमित्त सोने खरेदी करतात. याशिवाय गुंतवणुकीसाठी सोने हा एक उत्तम पर्याय देखील मानला जातो. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते जाणून घ्या.

1. Sovereign Gold Bond
सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असू शकतात जसे दागिने, सोन्याची नाणी, गोल्ड बुलियंस इ. मात्र या सर्वांमध्ये सर्वोत्तम पर्याय म्हणजे Sovereign Gold Bond मानला जातो. या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास जोखीम खूप कमी असते आणि तुम्ही कोणतीही चिंता न करता रिटर्न मिळवू शकता. Sovereign Gold Bond रिझव्‍‌र्ह बँकेकडून जारी केले जातात, त्यामुळे त्यांच्या शुद्धतेबद्दल कोणतीही अडचण येत नाही. Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर देखील आहे. सोन्याच्या किंमतीव्यतिरिक्त, ते वार्षिक 2.5 टक्के फिक्स्ड रिटर्न देते.

2. Gold ETF
शेअर्ससारखे सोने खरेदी करण्याच्या सुविधेला Gold ETF म्हणतात. ही म्युच्युअल फंड योजना आहे. सोन्यात गुंतवणुकीसाठीचा हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत जे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विकले जाऊ शकतात. Gold ETF चा बेंचमार्क स्पॉट सोन्याच्या किंमती असल्याने, तुम्ही ते सोन्याच्या वास्तविक किमतीच्या जवळ खरेदी करू शकता. Gold ETF खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ट्रेडिंग डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. याद्वारे युनिटमध्ये सोन्याची खरेदी केली जाते. ते विकल्यावर तुम्हाला सोने मिळत नाही तर त्यावेळच्या बाजार मूल्याएवढी रक्कम मिळते.

3. Gold Mutual Funds
Gold ETF च्या तुलनेत गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे आहे. तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये थेट ऑनलाइन पद्धतीने किंवा त्याच्या डिस्ट्रीब्यूटर्सद्वारे गुंतवणूक करू शकता. दुसरीकडे, Gold ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये, AMC रिटर्न साठी गोल्ड ETF मध्ये त्याचा कॉर्पस गुंतवते. याव्यतिरिक्त, गोल्ड म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना SIP द्वारे गुंतवणूक करण्याची परवानगी देतात. गोल्ड म्युच्युअल फंड ही ओपन-एंडेड इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स आहेत जी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF) मध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांचे नेट ऍसेट्स व्हॅल्यू (NAV) ETFs च्या कामगिरीशी जोडलेले असते.

4. सोन्याचे दागिने खरेदी करणे
सोन्याचे दागिने किंवा फिजिकल गोल्ड मध्ये गुंतवणूक करणे सुरुवातीपासूनच चांगले मानले जाते. यासाठी तुम्ही ज्वेलर्सकडून तुमच्या आवडीचे सोन्याचे दागिने खरेदी करा. सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक चांगला मार्ग मानला जातो. यामध्ये भविष्यात सोन्याची किंमत वाढल्यास तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

Leave a Comment