सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! राष्ट्रवादी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विदेशातील सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीटमुळं देशात राजकारण तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची (Celebrities tweet) चौकशी करण्याचा इशारा आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विटरवर प्रतित्युत्तर दिलं आहे. “सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा”, असं ट्विट करत  अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

दरम्यान, जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने (Pop singer Rihanna ) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देतांना अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. परदेशी व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बोलू नये, भारत एक आहे, देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू अशा आषयाचे ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटींनी केले होते. मात्र शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भाजपने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी देशमुख यांच्याकडे केली. यावेळी देशमुख यांनी या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन सावंत यांना दिले.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment