मुलीचे लग्न करायचे असो किंवा रिटायरमेंट प्लॅन बनवायचा असो, SIP द्वारे सर्व शक्य आहे;कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पै अन पै जोडतो. या बचतीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात नक्कीच मदत होते. मात्र ही बचत योग्य फंडांमध्ये गुंतवली तर तुम्ही सर्वात मोठे आर्थिक उद्दिष्टही पूर्ण करू शकता.

म्युच्युअल फंड हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे जिथे तुम्ही थोड्या प्रमाणात गुंतवणुक करून प्रचंड संपत्ती जमा करू शकता. बाजारातील जोखीम असताना म्युच्युअल फंड तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकतात. तुमच्या आर्थिक उद्दिष्टात 5 ते 7 वर्षांचा कालावधी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता. 5 ते 7 टक्के गुंतवणुकीसह, तुम्हाला म्युच्युअल फंडातून 12 ते 15 टक्के वार्षिक रिटर्न मिळू शकतो. SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा थोडीशी रक्कम गुंतवता येते.

अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करा
जर तुम्ही अजूनही गुंतवणूक सुरू केली नसेल, तर आत्ताच करा. कारण शेअर बाजारात जोखीम जास्त असते आणि बँकांमध्ये रिटर्न नगण्य असतो. सोने-चांदी किंवा जमीन खरेदी करू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमच्या बचतीचा काही भाग म्युच्युअल फंडात दर महिन्याला गुंतवला तर तो येणाऱ्या काळात खूप मदत करू शकतो.

समजा ओंकार महाजन हे 35 वर्षांचे आहेत. 15 वर्षांनंतर त्यांच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी त्यांना किमान एक कोटी रुपये लागतील. याशिवाय 25 वर्षांनंतर त्यांचे रिटायमेंटही येणार असून, त्यासाठी त्यांना सुमारे दोन कोटी रुपयांची गरज आहे.

‘या’ सूत्राचे पालन करा
म्युच्युअल फंडामध्ये SIP गुंतवणुकीसाठी एक उत्तम सूत्र आहे ते म्हणजे नियम 15x15x15. या सूत्राचा वापर करून ओंकार आपले दोन्ही लक्ष्य पूर्ण करू शकतो.

या सूत्रानुसार ओंकारला म्युच्युअल फंडात 15 वर्षांसाठी 15 हजार रुपये महिन्याला SIP करावी लागेल. या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. 15 वर्षात त्यांची एकूण गुंतवणूक 27 लाख रुपये असेल आणि त्यावर 15 टक्के दराने सुमारे 73 लाख रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे दिनेशला 15 वर्षांनंतर त्याच्या मुलीसाठी 1,00,27,601 रुपयांचा फंड मिळेल.

रिटायरमेंट प्लॅन
आता रिटायरमेंटची वेळ आली आहे. रिटायरमेंटसाठीही ओंकारला वेगळे काम करावे लागेल आणि आतापासून महिन्याला 15 हजार रुपये SIP चे सूत्र असेल. म्हणजेच, त्यांना आतापासून महिन्याला 30,000 रुपयांची SIP सुरू करावी लागेल. या SIP च्या मदतीने ओंकार त्याचे दोन्ही लक्ष्य पूर्ण करू शकतो.

आता तुम्ही विचार करत असाल की, 27 लाखांवर 73 लाख रुपये व्याज, हे कसे शक्य आहे. होय ते शक्य आहे. वास्तविक, SIP मध्ये, कम्पाउंडिंग फॉर्म्युला म्हणजेच चक्रवाढ व्याज जोडले जाते. सुरुवातीला मूळ गुंतवणुकीवर व्याज मिळते आणि त्यानंतर व्याजावर व्याज मिळते.

Leave a Comment