‘या’ वयापर्यंतच पुरुषांना होऊ शकतात सुदृढ बालके; संशोधनातून मोठी माहिती समोर

male Fertility
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजवर आपण महिलांच्या प्रेग्नेंसीबद्दल नेहमीच ऐकले आहे. योग्य वयातच मुले व्हावी. त्यासाठी महिलांचे वय त्यांचे हार्मोन्स या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजेच एका ठराविक वयापर्यंतच महिला एका सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते. परंतु यामध्ये कधीच कुणी पुरुषांचा विचार करत नाही. एका बालकाला जन्म देण्यासाठी जेवढे आईचे वय महत्वाचे आहे. तेवढेच वडिलांचे वय देखील महत्त्वाचे आहेत.

आजकाल अजूनही काही दुर्मिळ भागात असा देखील समज आहे की, जर एखाद्या जोडप्याला मुलं झाली नाही. तर त्यातही त्या महिलेचा दोष आहे, असे समजतात. परंतु पुरुषांची वैद्यकीय तपासणी कोणीही करत नाही. एखाद्या विवाहित जोडप्याला मूल न होणे यामागे अनेक कारणे असतात. परंतु त्यातही स्त्री आणि पुरुषाचे वाढते वय देखील खूप कारणीभूत असते. अनेकांना असे वाटते की, पुरुषांच्या वयाचा मुले जन्माला येण्याशी काही संबंध नसतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे.

एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधानुसार असे समोर आले आहे की, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या त्यांच्या वाढत्या वयानुसार कमी-कमी होत जाते. एवढेच नाही तर त्याची गुणवत्ता कमी होते. महिलांची मासिक पाळी बंद झाली की, त्या गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. परंतु पुरुषांमध्ये शुक्रवारी बनवण्याची ही प्रक्रिया कशी थांबत नाही. त्यामुळे पुरुषांचे वय कारणीभूत नाही. असे अनेकांना वाटते. परंतु तसे नाही, शुक्राणू बनवण्याची प्रक्रिया जरी चालू असली, तरी त्यांची गुणवत्ता आणि संख्या वयानुसार कमी कमी होत जाते.

पुरुषांचे जसे वय वाढत जाते. तसतसे पुरुषांच्या शुक्राणूंचे अनुवंशिक परिवर्तन होते. त्यामुळे त्यांच्या शुक्रानुंच्या डीएनएमध्ये देखील परिवर्तन होण्याचा धोका असतो. त्यामुळे पुरुषांचे वय देखील खूप महत्त्वाचे असते. कधी कधी तर वाढत्या वयानुसार पुरुषांची वडील होण्याची शक्यता देखील कमी होते.

हाती आलेल्या माहितीनुसार 40 वर्षानंतर पुरुषांची वडील बनण्याची क्षमता कमी होते. जर 40 वर्षानंतर एखादा पुरुष वडील झाला, तर त्या बाळाच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. इतकेच नव्हे तर त्या स्त्रीच्या गर्भावस्थेत असतानाच बाळाचा अकाली जन्म यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

तसेच वडिलांचे वय जर जास्त असेल तर बाळाला निरोलॉजिकल रोग होण्याचा देखील धोका वाढत असतो. तसेच बाळाच्या हृदयाच्या समस्या निर्माण होतात. तज्ञांच्या मते 25 ते 30 वर्षे वय हे पुरुषांसाठी वडील होण्याची अगदी योग्य वय आहे. या वयामध्ये शुक्राणू जास्त सक्रिय असतात. परंतु 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे पुरुष वडील झाले तर बाळाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.