हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने मराठी माणसाला एक खूप मोठी आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मागील अनेक वर्षापासून ही मागणी केली जात होती. अखेर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सरकारने ही मागणी पूर्ण केलेली आहे. परंतु आपली प्राचीन भाषा ही वेगळीहोती? तमिळ आणि संस्कृत या या दोन भाषा हजारो वर्षापासून एकमेकांशी संघर्ष करीत आहेत. आता त्यातीलसगळ्यात प्राचीन भाषा नक्की कोणती आहे ? हे पाहून जाणून घेऊया
भारतामध्ये संस्कृत भाषा आणि तमिळ भाषा या दोन खूप जुन्या भाषा आहेत. परंतु या दोन्हींमध्ये नक्की प्राचीन भाषा कोणती आहे यावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले आहे. तमिळ भाषेबद्दल पाहायला गेलो, तर या भाषेचे तब्बल 2300 वर्षांपूर्वीचे कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे ही भाषा सगळ्यात जुनी लिखित तिसऱ्या शतकात असल्याची मानली जाते.
त्याचप्रमाणे संस्कृत भाषेला सर्वात जुनी भाषा मानले जाते. त्यानंतर पुढे अनेक विविध भाषांचा विकास झालेला आहे. याबद्दलची संशोधकांनी माहिती दिलेली आहे. परंतु संस्कृत या भाषेचे जवळपास 3500 वर्षांपूर्वीचे दस्तऐवज उपलब्ध आहे. संस्कृतमध्ये अनेक प्राचीन वेद देखील लिहिलेले आहेत. तमिळ आणि संस्कृत या भारतातील सर्वात प्राचीन भाषा आहेत. आणि त्या समृद्ध आहेत यापैकी तमिळ ही सर्वात प्राचीन आणि लिखित परंपरेत कायम असलेली भाषा आहे. तसेच संस्कृत ही जगातील सगळ्यात जुनी भाषा आहेत असे देखील मानले जाते
तमिळ ही भाषा अनेक राज्यांमध्ये बोलले जाते. ही भाषा तमिळनाडू, श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियामध्ये देखील बोलली जाते संस्कृती एक इंडो आर्यन भाषा आहे. भारतातल्या सगळ्या भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषाकडे पाहिले जाते. तमिळ ही जगातली एकमेव अशी भाषा आहे. जिथे पाच ज्ञानकोश आहेत. संस्कृत भाषा ही मुख्यतः हिंदू ग्रंथमध्ये आढळून येते तसेच प्राचीन भारतीय साहित्य देखील संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. तमिळ ही जगातील सगळ्यात लेखन प्रणाली एक आहे.