कोरोनाने हाहाकार घातला असताना ‘ही’ लव्हस्टोरी होतीये युरोपमध्ये प्रचंड व्हायरल! घ्या जाणुन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही एक अशी प्रेम कथा आहे, हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. कोरोनाच्या कहरात एक सुंदर लवस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हि एका ८५ वर्षीय इंगा रास्मुसेन आणि ८९-वर्षीय कार्स्टन तुक्सेन यांची प्रेमकथा आहे. इंगा डेन्मार्कमध्ये राहतात तर कार्स्टन जर्मनीमध्ये राहतात. पूर्वी ते रोज भेटत असत. अद्यापही भेटतात परंतु बंद सीमेच्या दोन्ही टोकापासून. वास्तविक कोरोनामुळे या दोन देशांच्या सीमा सध्या बंद केल्या आहेत.

ही लव्हस्टोरी दोन वर्षांपूर्वीची आहे जी आजकाल डेन्मार्क आणि जर्मनीबरोबर संपूर्ण युरोपमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी प्रेमाबद्दल सांगितले होते, त्यानंतर आजपर्यंत क्वचितच एखादा असा दिवस गेला आहे जेव्हा ते एकमेकांना भेटले नाहीत. एकमेकांना पाहिले नाही परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना विषाणू त्यांच्या प्रेमाच्या दरम्यान आला आहे. कोरोनामुळे,सर्व युरोपीय देशांनी बॅरिकेड्ससह त्यांच्या खुल्या सीमा बंद केल्या आहेत.

आता सीमा बंद असतात,यानंतरही, इनगा आणि कार्स्टन यांनी भेट घेणे थांबवले नाही, फक्त आता ते थोड्या अंतरावरून भेटतात.इंगा आपल्या सायकल वरून डेन्मार्कच्या सीमेपर्यंत येतात तर कार्स्टन जर्मनीच्या सीमेपर्यंत. बॅरिकेड्सच्या दोन्ही बाजूंनी दोघे समोरासमोर बसतात.आणि नंतर निरोप घेतात.

एक जर्मनीत आणि दुसरा डेन्मार्कमध्ये 
इंगा डेनिस डेन्मार्क च्या सीमेजवळील गालेहूस गावात राहतात, तर कार्स्टन जर्मनीच्या सॅदरलुगाममध्ये राहतात. या दोन ठिकाणांमधील अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे आणि सीमा मध्यभागी आहे. असे होईपर्यंत ते दोघे आरामात भेटत असंत. गेल्या दोन आठवड्यांपासून सीमा बंद आहे. कोरोना विषाणूचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर झाला आहे. अशा परिस्थितीत हे १५ किलोमीटरचे अंतर पार करताना एकमेकांना भेटणे अशक्य होते.

 

तरीपण दररोज भेटतात आणि बराच वेळ गप्पा मारत बसतात.आता दोघे अर्धा अर्धा प्रवास करतात आणि दुपारी सीमेवर पोहोचतात.इंगा तिची कारने येते तर कार्स्टन त्याच्या इलेक्ट्रिक सायकलसह.

दोघेही सीमेच्या दोन्ही बाजूला खुर्च्या ठेवतात, ज्या ते आपल्या घरातून आणतात. आपले जेवण टेबलवर सजवतात.कॉफी पितात,वर्तमानपत्रे वाचतात.गप्पा मारतात.संध्याकाळी ते या भागात अल्कोहोलने बनविलेला गरम चहा पितात. एकमेकांना आरोग्यासाठी शुभेच्छा देतात आणि दुसर्‍या दिवशी येण्यासाठी सांगून निघून जातात.

दोघेही प्रेमी सुरक्षित अंतर ठेवूनच भेटतात. ते मिठी मारणे, चुंबन देणे आणि हात मिळविणे टाळतात असे केल्याने ते कोरोनाव्हायरसचा प्रसार होण्यापासून देखील वाचतात. सीमा बंद होण्याआधीपर्यंत हे दोघेही मिठी मारून एकमेकांना चुंबन देत असत. परंतु आता वेळेचे भान ठेवत असे करण्याऐवजी ते दुरूनच भेटतात.

अशाप्रकारे हे फोटो झाले व्हायरल
आता आपल्याला आश्चर्य वाटेल की या वृद्ध जोडप्याचे हे अनोखे प्रेम जगाला कसे कळले. हे घडले डेनिस टाऊन टँडर्नचे महापौर हेन्रिक फ्रान्सन यांच्यामुळे, त्यांनी हे फोटो उत्स्फूर्तपणे घेतले. त्यानंतर ते त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केले. त्यानंतर हे वेगाने शेयर केले गेले. या कथेला नाव दिले गेले “लव्ह इन द टाइम ऑफ कोरोनाव्हायरस.”

इंगा म्हणतात, “हे वाईट आहे परंतु आम्ही ते बदलू शकत नाही.” सीमा बंद झाल्यानंतरही दोघे फोनवरही बरीच चर्चा करतात आणि भेटीच्या संबंधित गोष्टी ठरवतात.

पहिली बैठक कशी झाली
इंगा आणि कार्स्टन दोन वर्षांपूर्वी योगायोगाने भेटले. इंगा यांच्या पतीचे निधन झाले होते.कार्स्टनच्या पत्नीनेही जगाला निरोप दिला होता. एकटे राहत असल्यामुळे दोघे एकमेकांशी बोलू लागले. दरम्यान,कार्स्टनने इंगाला फुले दिली. वास्तविक, ही फुले कार्स्टनने दुसर्‍या महिलेसाठी घेतली होती, परंतु शेवटी त्यांनी ते इंगाला दिले ..

दुपारी कार्स्टन इंगाला विचारले की ती त्यांच्याबरोबर फिरायला येईल का? इंगाने त्यांस सहमती दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कार्स्टनने इंगाला पार्टीला आमंत्रित केले आणि प्रेम प्रकरण सुरू झाले. दोघांनाही आठवत आहे की १३ मार्च २०१९ पासून ते दोघेही दररोज एकमेकांसोबत राहिले. इंगा आणि कार्स्टन आशा करतात की इस्टरच्यावेळी ही सीमा उघडेल आणि ते पुन्हा एकमेकांबरोबर हँगआउट करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

Leave a Comment