Wednesday, February 8, 2023

BREKING NEWS : रेंगडी येथे ओढा पार करताना 2 महिला व 2 पुरूष वाहून गेले

- Advertisement -

जावळी | जावळी तालुक्यातील रेगडी गावातील ओढ्यावरुन भात लागण करुन येत असताना चार शेतकरी वाहुन गेली असल्याची माहीती जावली तहसिलदार कार्यालयाने दिली आहे. शेतातील काम आटपून परतत असताना गावातील ओढा पार करत असता एकजण वाहुन गेला. त्याला वाचवण्याकरीता गेलेले तिघेजण देखील वाहून गेल्याची घटना उघडकीस आलेली आहे. चाैघे वाहून गेल्याच्या घटनेत 2 पुरूष व 2 महिलांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जावळी तालुक्यातील रेगडी या गावातील शेतकरी शेतात भात लागण करण्यासाठी गेलेले होते. काम संपल्यानंतर पाण्यातून वाट काढत ओढ्यावरून येत असताना एकजण वाहून गेला. त्याला वाचविण्यासाठी इतर तीन जण गेले, मात्र दुर्देवाने चाैघेही वाहून गेले आहेत. रेवडी येथील ओढ्यावरून वाहून जाण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. पाच वर्षांपूर्वी देखील याच ओढ्यावरुन जात असताना दोघे वाहुन गेली असल्याची माहीती गावकऱ्यांकडून सांगितली जात आहे.

- Advertisement -

रेगडी गावातील मौजे रेंगडेवाडी (ता. जावली) येथे ओढा पार करत असताना 2 पुरुष व 2 महिला वाहुन गेल्या आहेत. यामध्ये सहदेव गणपत कासुर्डे (वय- 60), भागाबाई सहदेव कासुर्डे (वय- 50), तानाबाई किसन कासुर्डे (वय- 50), रविंद्र सहदेव कासुर्डे (वय- 30) याचा समावेश आहे. चाैघांचा शोध घेण्यासाठी केळघर घाट बंद असल्यामुळे महाबळेश्वर मार्गे मदत करण्याकरीता महसुल विभागाला कळवले आहे असल्याची महत्वपुर्ण माहीती जावली तहसिलदार यांनी दिली. ठीकठीकाणी रस्ते वाहून जाण्याने केळघर घाटातील वाहतुक बंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वाहून गेलेल्याचा शोध सुरु आहे.